Thursday, February 19, 2026
HomeTop Newsमहू धरणात अकरा वर्षांचा मुलगा पोहताना बेपत्ता: महाबळेश्वर ट्रेकर्स घ्या जवानांकडून शोध...

महू धरणात अकरा वर्षांचा मुलगा पोहताना बेपत्ता: महाबळेश्वर ट्रेकर्स घ्या जवानांकडून शोध सुरू

महू धरणात अकरा वर्षांचा मुलगा पोहताना बेपत्ता: महाबळेश्वर ट्रेकर्स घ्या जवानांकडून शोध सुरू 

कुडाळ : महू धरणात आज दुपारी गुरे चारण्यासाठी आले असता पोहताना चि. प्रणव संतोष गोळे (वय ११) हा बेपत्ता झाल्याची घटना घडली. अद्याप प्रणव याचा मृतदेह सापडला नसून महाबळेश्वर ट्रेकर्स चे जवान त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की महू ( तालुका जावली ) या धरणात महू गावातीलच शिवराम नारायण गोळे हे आपला नातू चि. प्रणव संतोष गोळे हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच गुरे चारत होते. गुरांना पाणी पाजून आजोबा रस्त्याकडे निघाले होते परंतु प्रणव हा त्याच दरम्यान धरणाच्या पाण्याकडे धावत जात होता. आजोबांनी आवाज दिला परंतु तो तसाच पळत होता. प्रणव पळत पाण्याकडे गेला आणि कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली.आजोबांनी लगेच  मुलगा अजित शिवराम गोळे याला याबाबत कळवले .हे वृत्त समजताच  गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. गावातील युवकांनी त्याचा शोध घेतला परंतु प्रणव सापडत नसल्याने लगेच महाबळेश्वर ट्रेकर्स च्या जवानांना पाचारण केले. जवानांनी बोटीच्या सहाय्याने  धरणात कसून शोध घेतला पण रात्री उशिरापर्यंत प्रणव सापडला नाही.अंधार पडल्याने रात्री उशिरा शोध थांबवण्यात आला.उद्या मंगळवारी सकाळी पुन्हा प्रणवच्या शोध घेण्यात येणार असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page