भरती करण्याचे आमिष दाखवून,
सांगली जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील चार व्यक्तींचा खुन
दोन दिवसात आरोपी गजाआड





सुरेश पार्टे / मेढा प्रतिनिधी
आर्थिक देवाणघेवाणीतून झाले खुन
आर्थिक देवाणघेवाणीतून सांगली जिल्ह्यातील पती-पत्नी सह त्यांच्या दोन मुलांचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा मुख्य सूत्रधार जावळी तालुक्यातील शेते फाटा येथील योगेश मधुकर निकम वय वर्षे 28 या दोनच दिवसात बेड्या ठोक०यात पोलीसांना यश आले आहे .या घटनेतील आरोपी योगेश निकम याला 1 सप्टेंबर रोजी मेढा न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
या घटनेतील गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने खुनाची कबुली दिलेली आहे. मृत विशाल जाधव व तुषार जाधव यांचे मृतदेह कुठे टाकले आहेत याची माहिती पोलिसांना दिली .त्यामुळे मयत विशाल व तुषार या दोन भावांचे मृतदेह शोधण्यास व पुढील तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सोईचे गेले. याबाबत शिवाजी जाधव यांनी मेढा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
अशी घडली घटना
घटनास्थळावरून व पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक 11 ऑगस्ट रोजी मालदेव खिंडीत मालदेव भिलार रोडच्या मारली घाटात निर्जनस्थळी एका पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता .सदर मयत व्यक्तीचा तपास वओळख पटविण्याचे काम सुरू असतानाच दिनांक 29 ऑगस्ट रोजी त्याच घाटामध्ये पहिल्या पुरुषाच्या मृतदेहाच्या थोड्याच अंतरावर महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ मिळालेल्या एका चिठ्ठीच्या आधारे चौकशी केली असता सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील एक पुरुष व महिला मिसिंग असले बाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे मिसिंग केस दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर मिसिंगमधील पुरुषात मयत पुरुषाचे वर्णन मिळतेजुळते असल्याने सदर घटनेबाबत पोलिसांनी बामणोली गावात चौकशी केली असता सदर चा मृतदेह सांगली जिल्ह्यातील बामणीली येथील च असल्याचे निष्पन्न झाले. व मयत दोघेही पती पत्नी असल्याचे सिद्ध झाले .त्यांच्या नातेवाईकांनी अधिक चौकशी केली असता मयत व्यक्तींची दोन मुले ही एक महिन्यापूर्वी मुंबईला भरतीसाठी गेली असल्याने त्यांना भेटण्यासाठी मयत पती पत्नी मुंबईला जातो असे सांगून गेले ते परत आले नाहीत. मयताच्या मुलांना एक इसम भरतीसाठी मदत करणार असून ती मुले त्याच्याकडे गेली असल्याचे समजले आणि सातारा जिल्ह्यातील पोलीस तपासाची चक्रे गतीने फिरू लागली .
सातारा व जावली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून मयत व्यक्तींची मुले तुषार जाधव वय वर्षे 26 व विशाल जाधव वर्षे 20 हे ज्या इसमाकडे भरतीसाठी गेले होते .त्या व्यक्तीचा वाजवी संशय आल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे जावली तालुक्यातील शेते फाटा ता जावली . येथील योगेश मधूकर निकम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पोलिसांची प्रथम दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला .परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने मारली मालदेव घाटात मिळालेल्या मयत व्यक्तना विष घालून लोखंडी रॉडने डोक्यावर व मानेवर वार करून खून केला असल्याचे सांगितले .बामणोली जिल्हा सांगली गावातील तुषार जाधव व विशाल जाधव या दोघा सख्ख्या भावांना मुंबई ते भरती करणार असल्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून लाखो रुपये उकळले होते नोकरी न लागल्याने मयत मुले व त्याचे मयत आई वडील यांच्या कडून वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्याने मयत तुषार व विशाल या दोघा भावांना आरोपी योगेश निकम मुंबईला भरती ला जायचे असे म्हणून 7 जुलै रोजी बोलावून घेतले .त्यानंतर दोन दिवस आरोपीने दोन्ही भावांना ट्रेनिंग नावाखाली मालदेव घाट व अनेक ठिकाणी आपल्या बाईकवरून फिरवत होता. दि. 10 जुलै रोजी याच घाटात पार्टीचा बहाणा करून त्यांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन एकेक करून दोन्ही भावांना संपवून दरीत फेकून दिले . मयत मुलांच्या आईवडिलांनी एक महिन्यात मुलांचा काहीच संपर्क होत नसल्याने आरोपी योगेश निकमला वारंवार फोन करून चौकशी केली असता व आमची मुले कुठे त्यांना आम्हाला भेटायचे आहे असा सारखा तगादा लावल्याने तुम्ही सातारा या तुम्हाला मुलांकडे मुंबईला घेऊन जातो असे आरोपीने सांगून दिनांक 7 ऑगस्ट रोजी त्यांना बोलावून घेतले .त्यांनाही स्वतःच्या गाडीने सातार वरून मालदेव मारली घाटात घेऊन गेला .जाताना त्यांनाही विष दिले व . त्यांना ही लोखंडी रॉडने डोक्यात वार करून घाटातील दरीत फेकून दिले असल्याचे तपासात कबूल केले आहे .दरम्यान दोन मुलांना मारल्याचे एक महिन्यामध्ये कोणाचेच लक्षात न आल्याने मुलांना ज्याठिकाणी मारून टाकले त्याच घाटात त्यांच्या आई-वडिलांनाही मारून टाकले. सदर आरोपीने मिल्ट्री भरती करता घेतलेले पैसे परत द्यावी लागते म्हणून दोन मुलांसह आई-वडील अशा एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना क्रुर रित्या संपले . दि. ११ ऑगस्ट रोजी तानाजी जाधव ( वडील), २९ ऑगस्ट रोजी आई मंदाकिनी जाधव , ३१ ऑगस्ट रोजी विशाल तर दि. १ सप्टेबर रोजी तुषार जाधव यांचे घाटात वेगवेगळ्या ठिकाणी हाडाचे सांगाडे आढळून आले आहेत. त्यातील काही वस्तु पुढील तपासासाठी पाठवि०यात आल्या आहेत.
दरम्यान या घटनेमध्ये योगेश निकम हा प्रथमदर्शनी सर्व खून एकटयानेच केल्याचे सांगत असला तरी ,यामध्ये मोठी साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसांचे आवाहन
दरम्यान जावली तालुक्यासह सातारा जिल्हा व अन्य जिल्ह्यातील युवकांची भरती साठी पैसे घेऊन फसवणूक झाली असेल तर त्यांनी सातारा व जावली पोलिस स्टेशन संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
सात तारखेचे गुड काय ?
दोन भावांना दिनांक सात जुलैला बोलावून मारून टाकले तर त्यांच्या आई-वडिलांना दिनांक सात आगस्ट लाच बोलावून मारून टाकले .त्यामुळे सात तारखेचे गुड काय हा एक प्रश्नच आहे.
कोरोणाचा असाही वापर
मयत मुलाच्या आई वडिलांना बोलावून तुम्हाला मुलांकडे घेऊन जातो असे सांगून त्यांना बोलावून घेतले त्यानंतर त्यांना घाटाकडे नेताना तुम्हाला कोरोना होऊ नये म्हणून इंजेक्शन घ्या असे सांगून इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले व त् त्यांचा खून केला.
घटनास्थळी जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांनी उपस्थीत राहून सर्व मयत व्यक्तींची ओळख पटवून घेतली . सर्व मृत देह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर टेकर्स व सातारा टेकर्स च्या युवकांनी परिश्रम घेतले .
कोण हा योगेश निकम?
योगेश मधुकर निकम वय ३८.शिक्षण बारावी झाले आहे. हा एका चांगल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातील मुलगा असल्याची माहिती पुढे येत आहे.वडील मुंबईत नोकरीला असल्याने हे कुटुंब मुंबईत होते. वडिलांच्या सेवानिवृत्ती नंतर अंदाजे सात ते आठ वर्षांपूर्वी हे सर्वजण गावी रहायला आले. सध्या राहणार शेते फाटा येथे आहे.आई वडिल,पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
कुडाळ येथील नवजीवन विद्यालयात तो काही वर्षे नोकरी करत होता.परंतु तिथेही त्याने आर्थिक अफरातफर तफर केल्याने त्याला काढून टाकण्यात आले.याबाबत संस्थेकडून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार होता परंतु संस्थेची असणारी रक्कम कुटुंबियांनी देण्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याने गून्हा दाखल केला नाही. तर त्याने उलट संबंधित विद्यालयाच्या संचालिका यांनी आपणास जातीवाचक शिवीगाळ व अपमान केल्याने आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्याच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.संस्थेची रक्कम मात्र अद्याप मिळाली नाही. अशीमाहिती कुडाळ येथील नवजीवन विद्यालयाच्या संस्थापिका रोहीणी निंबाळकर यांनी दिली.
त्याने आपल्या फेसबुक अकौटवर आपण माजी सैनिक असल्याचे भासवले आहे. परंतू तो आजतागायत खाजगी नोकरीतच होता.अशी माहिती पुढे आली आहे.
सदरच्या तपासाच्या कारवाई मध्ये जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते , अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके , मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील , अशोक पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, .पी. एच्. घोरपडे , सुर्यकात शिंदे, विनोद गायकवाड, मुबीन मुलाणी, संजय शिर्के , नंदकुमार महाडीक , सुनिल भिंगारे, राजकुमार ननावरे, योगेश पोळ , प्रविण कडव , जितेंद्र शिंदे , दत्तात्रय शिंदे, रोहित बाबर सनी काळे , इम्रान मेटकरी , पंकज बेसके , गणेश कचरे डी.जी. शिंदे यांनी तपास मोहिमेत सहभाग घेतला होता.