सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील मार्ली घाटात सांगली जिल्ह्यातील बामणोली येथील एकाच कुटुंबातील आई वडिलांसह दोन मुलांची हत्या झाली असावी प्राथमिक अंदाज आहे. जावली तालुक्यातील सोमर्डी येथील योगेश निकम या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना मुलांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेतलेल्या पैशाच्या देवाण घेवाणीतून झाल्याची शक्यता आहे.
मार्ली घाटात काल सोमवारी एक तर आज मंगळवारी एक असे आणखी दोन हाडांचे सांगाडे पोलिसांना सापडले आहेत. या सांगाड्यांची डीएनए तपासणी झाल्यानंतरच ते कोणाचे आहेत हे निष्पन्न होणार आहे.
गेल्या एकोणीस दिवसा पूर्वी मालदेव खिंडीमध्ये भिलारला जाणाऱ्या रोडवर मालदेव घाटातील दरीत मेढयापासून सुमारे तीन कि .मी . अंतरावर दि. ११ ऑगस्ट रोजी एका मध्यम वयाच्या पुरुषाचे बेवारस प्रेत आढळून आले होते . त्याच ठिकाणच्या परिसरात दि. २९ ऑगस्ट रोजी महिलेची पूर्ण सडलेली व फक्त हाडांचा सांगाडा असणारा मृत देह आढळा होता.. दोघांची ओळख पटविण्यात पोलीसांना यश आले आहे..
सदरच्या दोन्ही मयत पती तानाजी विठोबा जाधव वय ५५ तर,पत्नी सौ. मंदाकिनी जाधव वय ५० असून सांगली जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी विभागातील राहाणाऱ्या असून त्यांची २६व २२ वर्षाची दोन्ही मुले ही बेपत्ता असल्याचे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले .
संबधीत व्यक्तीच्या नातेवाईकांना मेढा पोलीस ठाण्यात अधिक माहितीसाठी व ओळख पटवण्यासाठी बोलवले असता त्यांनी मृत व्यक्ती त्यांच्याच नात्यातील असल्याचे सांगीतले आहे.
दरम्यान नोकरीच्या कामानिमित्त परगावी गेलेली सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी विभागातील बामणोली दत्तनगर येथील 26 व 20 वर्षे दोन युवक त्यांच्याकडे गेलेले त्यांचे आई-वडील हे चौघेही गेल्या महिन्यापासून संशया स्पदरीत्या गायब झाले आहेत .दिनांक सात ऑगस्ट पासून त्यांच्याशी संपर्क तुटला असून बामणोली – कुपवाड ( सांगली) येथील धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून याबाबत नातेवाइकांनी पोलिसात तक्रार दिली आहे .दरम्यान तानाजी विठोबा जाधव वय 55 तर त्यांची पत्नी मंदाकिनी जाधव वय 50 यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा तुषार जाधव वय वर्ष 26 व छोटा मुलगा विशाल जाधव 20 सर्व राहणार दत्तनगर बामनोली कुपवाड जिल्हा सांगली अशी गायब झालेल्यांची नावे असून त्यापैकी तानाजी जाधव वय 55 त्याची पत्नी मंदाकिनी जाधव यांचे मृतदेह मालदेव खिंडीत भिलार रोडला मेढयापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दिनांक 11 ऑगस्ट व २9 ऑगस्ट रोजी अनुक्रमे सापडले आहेत .दिनांक सात ऑगस्ट पासून सर्वजन गायब असून त्याच दिवशी तानाजीचा व मंदाकिनीचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 11 ऑगस्टला जेव्हा तानाजी जाधव चा मृतदेह सापडला तेव्हा त्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वीच झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता.
तानाजी जाधव यांचे बंधू शिवाजी जाधव वय वर्ष 45 यांनी कुपवाड पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी मिसिंग केस दाखल केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बामणोली दत्तनगर कुपवाड येथे तानाजी जाधव हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह अनेक वर्षे वास्तव्यास होते महिन्यापूर्वी नोकरीच्या निमित्ताने परगावी जातो असे घरात सांगून त्यांची दोन्ही मुले परगांवी गेली होती ते अद्याप परतले नाहीत .त्यानंतर काही दिवसांनी त्यापैकी एका मुलाने आई-वडिलांना मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी दोघेही पती-पत्नी स्वतंत्र भाड्याची चारचाकी गाडी करून सातारा पर्यंत आले होते. त्यांच्या मुलाने बामणोली .( कुपवाड ) येथून आनलेली भाडयाची गाडी परत पाठवून देवून आई-वडिलांना साताऱ्यातून दुसऱ्या गाडीत बसवून नेले. त्यानंतर ते दोघेही गुढ रित्या गायब झाले असून आई वडिलांचा मृतदेह जावळी तालुक्यातील मालदेव घाटात सापडले आहेत .तानाजीचे भाऊ शिवाजी जाधव यांनी वारंवार फोन केला असता कुणाचाही फोन लागला नाही त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे दरम्यान त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी व अधिक माहितीसाठी मेढा पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यांची ओळख पटली असून जोपर्यंत दोन मुले सापडत नाहीत तोपर्यंत नक्की प्रकार उघडकीस येणार नाही. मुलांनी पैशासाठी आई-वडिलांना संपली नाही ना ? मुलांचेही काही बरेवाईट झाले नाही ना.?का अन्य कोणाचा यामध्ये हात आहे .? सांगलीतून जावलीत संपाविन्यासाठी आणण्याचे काय कारण.? या तपासाची चक्रे आता पुण्याच्या दिशेने सुरू आहेत .दरम्यान मेढा पोलीस ठाणे व कुपवाड पोलीस ठाणे यांचे संयुक्त तपासाअंती या प्रकरणाचा नक्की निकाल लागेल. व आरोपी पोलीसाच्या सापळ्यात लवकरच सापडतील.
दरम्यान दोन मृतदेह एकाच ठिकाणी सापडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून . तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे..
पोलीस सुत्रांकडून मिळलेल्या माहीत नुसार मृत व्यक्तींच्या मुलांना नोकरीला लावतो म्हणून पुण्यातील एका व्यक्तीने पुण्याला नेहल
होते. त्याच मु त्यांच्या फोनचा वापर करून मृत आईवडीलांना पुण्याला बोलवून घेतले होते. त्यानंतर काय झालं , आणि मुलं कुठं आहेत. आई वडिलांचे मृतदेह जावली तालुक्यात कसे .? पुण्याची व्यक्ती कोण ? याचा तपास अद्याप सुरू असून मेढा पोलीस ठाणे व कुपवाड एमूआयडिस पोलीस ठाणे यांच्या संयुक्त तपासाअंकी खरे प्रकरण नक्कीच बाहेर येईल.
महिलेच्या मृत देहामुळेच तपासाला गती मिळाली .
११ ऑगस्ट रोजी पहिली बॉडी सापडली . पण ओळख न पटल्याने पोलीस संबधीत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या शोधात होते . २९ ऑगस्ट रोजी त्याच! ठिकाणी थोडया अंतरावर महिलेची बॉडी सापडली आणि पोलीसाच्या तपासाला एक दिशा मिळाली. आणि दोन्ही व्यक्ति सांगली जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके . मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी घटना स्थळी भेट देवून तपासासाठी सहकाऱ्यांना सुचना केल्या.सपोनि . अशोक पाटील , कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चामे , श्री. शिर्के , डी. डी. शिंदे तपास करत आहेत.
भयंकर आणि विचार करायला लावणारी दुर्दैवी घटना.