Monday, April 6, 2026
HomeTop Newsमेढा पोलीस उगाचच मारतात मिशीला पीळ; तपास कामात मात्र सगळीकडे खीळ

मेढा पोलीस उगाचच मारतात मिशीला पीळ; तपास कामात मात्र सगळीकडे खीळ

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या वर्षभरात मेढा पोलीस ठाण्याच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.अनेक छोट्या मोठ्या चोर्या व अन्य गुन्ह्यांचा तपास कित्येक महिन्यांपासून धूळखात पडून आहेत.वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या दोन तीन कारवाईने हुरळुन गेलेले मेंढा  पोलीस अधिकारी उगाचच मिशीला पीळ मारत असल्याची चर्चा आता जावली तालुक्यात होत आहे.

       मेढा पोलिसांच्या कारभारा विषयी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या व्यथा पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.सर्वसामान्य जनतेवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे.

          सर्वसामान्य जनता योग्य न्याय मिळण्याच्या आशेने पोलिसांकडे धाव घेत असते.पण याठिकाणी  वशीला आणि  पैसा असेल तरच त्याच ठिगळ लागतंय असं लोक आता उघड बोलत आहेत.कोरोनाच्या दुसर्या लाटेत लोकांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रशासन अॅलर्ट वर होते.त्यावेळी जावली तील पोलीस मात्र हातावर हात ठेवून डोळे मिटून बसले होते. त्यांना जाग करण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवला.त्यावेळी अर्धवट झोपेतून उठल्याप्रमाणे पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात ऐवजी घराच्या अंगणात बसलेल्या अबाल वृद्धांवर अमानुष लाठी चार्ज केला.त्याच वेळी जुगार,मटका ,दारू या सारख्या अवैध व्यवसायांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दी पोलिसांना दिसली नाही.गेल्या पंचवीस वर्षांत मेढा पोलिसांचा एवढा ढिसाळ अन् नियोजन शून्य कारभार कधीच नव्हता अशी चर्चा होत आहे.

      अन् हे पोलीस आता विलासबाबा जवळ यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यासह वारकर्यांना स्थान बद्ध करत आहेत.पोलिसांच्या या दडपशाही कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page