Monday, April 6, 2026
HomeTop Newsमेरी एन्जल्सचे संस्थापक यशवंत पवार यांचे दुखद निधन

मेरी एन्जल्सचे संस्थापक यशवंत पवार यांचे दुखद निधन

सूर्यकांत जोशी कुडाळ – भालेघर गावचे उद्योगपती व मेरी एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक विचारवंत व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा. यशवंत रामचंद्र  पवार यांचे नुकतेच  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सातारा येथे रुग्णालयात  निधन झाले. ते ४७  वर्षांचे होते.

               जावली तालुक्यात पहिल्या इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी आपल्या राहत्या घरात सुरू केली.सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.दर्जेदार शिक्षण आणि उत्तम व्यवस्था यामुळे ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली व तब्बल बारावी पर्यंत याठिकाणी इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळू लागले.

            अत्यंत शांत, संयमी , मधुर  भाषी व चारित्र्य संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वसंतराव मानकुमरे यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने यशवंत पवार यांनी निवडणुक लढविली होती.

          यशवंत पवार यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाने भालेघर गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे . त्यांच्या पश्चात आई,भाऊ, पत्नी मुले असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page