जीवलगच्या जबाबदार जावलीकरांचे कौतुक
सूर्यकांत जोशी कुडाळ -जिवलग मित्र परिवार या व्हॅटसप ग्रुपच्या माध्यमातून गेल्या वर्षी कोरोना काळात आम्ही एक जबाबदार जावलीकर हे अभियान सुरू केले ग्रुपमधील तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जस जमेल तशी मदत केली,कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे महत्वाचे काम जिवलग मित्र परिवाराणे केले याच जिवलग मित्र परिवारातील एक सदस्य जावली बँकेचे संचालक मा मोहनराव मानकुमरे यांनी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिमिटर व एक वाफेचे मशीन भेट दिले ,,,ते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भगवान मोहिते यांच्याकडे सुपूर्त करताना मा शशिकांत गुरव,मा सयाजीराव शिंदे व गलगले सर उपस्थित होते.
मा मोहनराव मानकुमरे तात्या यांचे जिवलग मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक आभार मानण्यात आले.
