‘
आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता या वर्षीही आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर करहरच्या विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे याबाबतचा आदेश तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी काढला आहे त्यामुळे यावर्षीही भक्तांची आणि लाडक्या पांडुरंगाची भेट होणार नाही
याबाबत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रति पंढरपूर करहर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द करण्यात येत आहे एकादशीला सकाळी सात वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येईल हभप दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पादुका पालखी काटवली व बेलोशी येथून फक्त चार भाविकांच्या समवेत करहरला आणल्या जातील
महापूजा झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात येणार असून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले आहे सपोनि अमोल माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये १४४ कलम लागू केले असून कोणालाही कामाव्यतिरिक्त प्रति पंढरपूर करहर गावात प्रवेश दिला जाणार नाही कोणी आदेशाचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असेही सपोनि माने यांनी सांगितले आहे
