Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsरानगेघर - ठाणे एसटी सेवा नियमित सुरू ठेवा- प्रवाशांची मागणी. मेढा आगाराच्या...

रानगेघर – ठाणे एसटी सेवा नियमित सुरू ठेवा- प्रवाशांची मागणी. मेढा आगाराच्या कारभाराविषयी प्रवाशांत तीव्र संताप


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्याच्या कुडाळ विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार रानगेघर – ठाणे एसटी बस सुरू करण्यात आली आहे परंतु मेढा घराच्या माध्यमातून ही बस अनियमितपणे सोडण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे ही बस सेवा नियमित सुरू ठेवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
            कुडाळ व करहर विभागातील प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार मेढा आगाराच्या माध्यमातून मेढा रानगेघर ते ठाणे अशी बस सेवा   मंगळवार दि. १७/०३/२०२६ रोजी सुरु करण्यात आली. ही बस रात्री ९:०० वाजता रानगेघर वरुन सुटते व  पहाटे  ४ वाजता ठाणे येथे पोहचते . बसचा मुंबईला  जाण्याचा मार्ग, मेढा, आलेवाडी, दरे, करंदी, रानगेघर, करंदी, इंदवली, आखाडे, हुमगाव, कुडाळ, पाचवड, शिरवळ, वाशी, ठाणे असा आहे. तसेच ठाणे येथून ही बस रात्री १०:०० वा. सुटते व  रानगेघर मध्ये पहाटे ५ :०० वा. पोहचते . ही बस जावली तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्यंत सोयीचे आहे. या बसला जर रिझर्वेशन ची सुविधा उपलब्ध करून दिली तर नियमित प्रवासी मिळू शकतील.
          ही बस दररोज नियमित वेळेत सुटणे आवश्यक आहे. परंतु बस रोज सुटत नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. अनियमित बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे व वेळ वाया जात आहे.बसचे रिझर्व्हेशन होत नसल्याने लोक गोंधळलेले आहेत. तरी ही बस रिझर्व्हेशनला टाकण्याची व्यवस्था मेढा आगारातून करण्यात यावी. तसेच प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी  ह्या बसचा मार्ग  करहर पर्यंत वाढविण्यात यावा. रात्री गावावरून मुंबईला जाण्यासाठी एकही एसटी महामंडळाची बस सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना खाजगी गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. तरी ही बस सेवा नियमित सुरू ठेवावी अशी मागणी, ज्ञानेश्वर महादेव भोसले, शंकर भिकू करंदकर – पाटील, मधूकर बबन भोसले,सुनिल तुकाराम भोसले,जीवन बजीरंग भोसले,विजय रामचंद्र सुर्वे,जनार्दन वामन करंदकर, उत्तम आण्णा करंदकर,आदिनाथ एकनाथ मोरे,विशाल मिलिंद गंगावणे,बाळासाहेब गणपत निकम,संतोष सुर्वे,श्री. इंदलकर,विकास धोंडे,संतोष महामुलकर यांनी केली आहे.
संदीप परामणे यांचा मेढा आगार व्यवस्थापकांना सूचना – म्हसवे गटातील प्रवाशांच्या दृष्टीने या बसचे महत्त्व ओळखून  भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी मेढा  आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधूनसदरची गाडी तातडीने सुरू करावी अशी सूचना केली आहे. सदर गाडी तातडीने नियमित सुरू करावी अन्यथा प्रवाशांच्या भावनेचा उद्रेक होईल व प्रवाशांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.
        

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page