Monday, April 6, 2026
HomeTop Newsकै.लालसिंगराव शिंदे पतसंस्थेची दहा कोटींच्या ठेवीकडे दमदार वाटचाल - सौरभ शिंदे.संस्थेची 33...

कै.लालसिंगराव शिंदे पतसंस्थेची दहा कोटींच्या ठेवीकडे दमदार वाटचाल – सौरभ शिंदे.संस्थेची 33 वी वार्षिक सभा खेळीमेळीत

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही कै.लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेने सभासद आणि ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासाने पाच कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे.पतसंस्थेने आता दहा कोटींच्या ठेवी कडे वाटचाल सुरू केली असून    ठेवीदार सभासदांच्या अतूट विश्वासाच्या जोरावर हे लक्ष लवकरच संस्था  गाठेल असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले.

             कुडाळ ता. जावली येथील कै. लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आॅनलाईन पद्धतीने नुकतीच पार पडली.त्यावेळी सौरभ शिंदे बोलत होते.

             चालू आर्थिक वर्षांत डिपॉझिट मध्ये चार कोटीहून साडेपाच कोटी पर्यंत भरघोस वाढ झाली आहे.संस्थेचे सोळा लाखाचे ओर ड्राफ्ट कर्ज पूर्णता निरंक करण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात खर्चात पूर्ण काटकसर केली आहे.त्यामुळे संस्थेला मागील शिल्लक व चालू असा एकञित  सहा लाख दहा हजार रुपयांचा भरघोस नफा झाला आहे.संस्थेने आज पर्यंत विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.असे सौरभ शिंदे यांनी सांगितले.

         संस्थेच्या वसूल भांडवलाची मर्यादा पन्नास लाखांच्या वर गेल्यामुळे पोटनियम दुरुस्ती करणे आवश्यक असलेने पोटनियम दुरुस्ती विषय नोटीस वर घेतलेला आहे एक कोटी मर्यादा करण्याचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.सभेचे नोटीस वाचन प्रकाश शिवणकर यांनी केले.संस्थेचे व्यवस्थापक अशोक साबळे यांनी अहवाल वाचन केले.

              सभेला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दादा पाटील मालोजीराव शिंदे ,जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे,संस्थेचे मार्गदर्शक  उत्तम पवार वसंतराव तरडे दत्तात्रय घाडगे नारायण पाटील बाळासाहेब निकम, चंद्रकांत इनामदार आदी मान्यवर तसेच पतसंस्थेचे संचालक मोहन देशपांडे राहुल बावकर देविदास शेवते सुवर्णा तरडे अंकुशराव शिवणकर सर्जेराव कांबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page