Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsलोकसहभागातून साकारलेले कुडाळचे इमरजन्सी कोरोना केअर सेंटर रुग्णांसाठी संजीवनी ठरेल - आ....

लोकसहभागातून साकारलेले कुडाळचे इमरजन्सी कोरोना केअर सेंटर रुग्णांसाठी संजीवनी ठरेल – आ. शिवेंद्रसिंहराजें

कुडाळच्या इमरजन्सी कोविड सेंटर लोकार्पण

कुडाळच्या इमर्जन्सी कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन करताना आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले व मान्यवर

कुडाळ – उपचारा अभावी आता अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी अत्यवस्थ रुग्णांना मोठ्या रुग्णालयात बेड मिळे पर्यंत प्राथमिक उपचार सुरु व्हावेत या उदात्त हेतुने कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून सुरु करण्यात आलेले कोरोना इमरजन्सी केअर सेंटर रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरेल असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी केले.

        लोकसहभागातून साकारलेले कुडाळ येथील कोरोना इमरजन्सी केअर सेंटरचे आ. भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे ,तहसीलदार शरदपाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, डॉ. विलास परामणे,डॉ. मनोहर ससाणे,जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक ,जितेंद्र शिंदे,मालोजीराव शिंदे, माजी सभापती सौ.अरुणा शिर्के, माजी उपसभापती रविंद्र परामणे,  डॉ, प्रमोद जंगम,डॉ. अमोल पालवे, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, डॉ. चव्हाणके मँडम यांची उपस्थित होते. 

           आ. भोसले म्हणाले , लोकसहभागातून साकारलेले कुडाळचे इमरजन्सी कोरोना सेंटर हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे.सध्या कोरोना संसर्गाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लोकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घ्यावी.लोकांनी कोरोना होऊच नये यासाठी अधिक दक्ष रहावे. 

           सौरभ शिंदे म्हणाले, कोरोना मुळे आपल्या जवळच्या लोकांची होणारी तडफड आणि अनेकांचे जात असलेले प्राण पाहुन कुडाळच्या युवकांनी कुडाळ येथे कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्धार केला.त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अवघ्या आठ दिवसांत दोन लाखांवर निधी जमा होऊन आँक्सिजन सह आठ बेडची सुविधा निर्माण झाली. प्रशासनाने याठिकाणी आवश्यक आरोग्य यंत्रणेसह हे केंद्र सुरळीत चालवावे.

          यावेळी तहसीलदार शरदपाटील यांनी या इमरजन्सी कोविड केअर सेंटरला आवश्यकती मदत केली जाईल असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी शासन पातळीवर या सेंटर साठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.

         यावेळी डॉ. मनोहर ससाणे व डाँ. विलास परामणे यांनी कुडाळ ग्रामस्थांच्या या संकल्पनेचे कौतुक करुन यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे सांगितले. कोरोनाला लोकांनी घाबरु नये.कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने कोरोना चे निदान करुन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

          या कोविड सेंटर साठी कुडाळ येथील उदयसिंह शिंदे यांनी एक  व आखाडे येथील मुंबई स्थित उद्योजक सचिन व संदीप शिंदे बंधू यांनी  एक ऑक्सीजन मशीन भेट दिले असून एक आँक्सिजन मशीन लोकसहभागातून घेण्यात आले आहे.तसेच अद्वैत वाँटर सर्व्हिसेसचे ज्ञानेश्वर शेलार यांच्या वतीने वाँटर प्युरीपायर मशीन भेट देण्यात आले.यावेळी आ.बाबाराजे कट्टर समर्थक ग्रुपच्या वतीने या कोविड सेंटर साठी तीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.

           कार्यक्राचे प्रास्ताविक पत्रकार महेश बारटक्के यांनी केले. यावेळी युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page