कळंबे महाराजांच्या सोहळ्याचा राजकीय आखाडा करणार्या
कुडाळ – हभप.दत्ताञय महाराज कळंबे यांच्या निर्वानाच्या दिना निमित्त आयोजित पुण्यतिथी सोहळ्यात फटाक्यांची आतिषबाजी करून व महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरे प्रमाणे सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देऊन गालबोट लावणार्या वसंतराव मानकुमरे यांचा वारकरी सांप्रदाय व नियोजन समितीच्या वतीने बेलोशी येथे हभप दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या समाधी स्पथळी आयोजित पञकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.महाराजांच्या घरावर दगड मारणारांनी समाधी स्थळांचा आखाडा बनवू नये.असा इशारा यावेळी देण्यात आला.
महाराजांच्या घरावर दगड मारणारांचा आता त्यांच्या बॅंकेवर डोळा.- विनोद कळंबे
ज्यांनी महाराजांच्या घरावर दगड मारले त्यांचा आता महाराजांनी स्थापन केलेल्या बॅंकेवर डोळा आहे.जावली बॅंकेची आगामी निवडणुक डोळ्यापुढे ठेवूनच मानकुमरे यांनी स्वत:चा मोठे पणा मिरवण्यासाठी कार्यक्रमाचा औचित्य भंग करुन वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचवली आहे.अशी घणाघाती टीका वैकुंठवासी हभप दत्तात्रय फक्त महाराज कळंबे यांचे नातू विनोद कळंबे यांनी यावेळी केली.
आदरणीय महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांना यांनी हरताळ फासून या कार्यक्रमाचा राजकीय आखाडा कोणीही बनवू नये. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्वांनी यावे पण या सांप्रदायिक कार्यक्रमाचे भान ठेवून त्याचा आदर ठेवावा अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
महाराजांच्या निर्वाणाला वीस वर्षे झाली.त्यांनंतर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार धार्मिक कार्यक्रम होत आहेत.असे असताना यावर्षी या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देऊन काही मंडळींनी गालबोट लावले.वारकरी मंडळी हा कार्यक्रम अतिशय भक्ती व श्रद्धेने महाराजांच्या चरणी लीन होऊन अंत्यत तळमळीने पारायण व पुण्यतिथी सोहळा पार पाडतात. या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप आणू नये असे नियोजन बैठकीत ठरते.आणि त्याप्रमाणे सर्वं पार पाडले जाते. परंतू यावर्षी काल्याचे किर्तन सुरू असताना वसंतराव मानकुमरे यांना सांगून सुद्धा त्यांनी राजकीय कारणाने नेत्यांची मिरवणूक काढुन फटाक्यांची आतषबाजी केली.त्यामुळे किर्तन थांबवावे लागले.त्यांची ही कृती निषेधार्ह आहे.हा महाराजांच्या निर्वानाचा कार्यक्रम होता.अशा दुःख द प्रसंगी अशाप्रकारे उत्सव करणे दुर्भाग्य पूर्ण आहे.अशी भावना वारकर्यानी व्यक्त केली.
या कार्यक्रमात केवळ राजकीय सत्कार करण्यात आले.वारकरी सांप्रदायाचा कोणताही साधा नामोल्लेख सुद्धा झाला नाही.चाळीस फुटांच्या आणलेल्या हारात राजकीय लोकांची गुंफून करण्यात आली.त्याचा वारकरी सांप्रदायाचा कोणताही संबंध नाही.तर या महाशयांनी स्वतः ची कविता सादर करण्यासाठी आरती थांबवण्याचा प्रयत्न केला.चांगल्या उपक्रमाला कोणीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करु नये. व यापुढे महाराजांचा असा अवमान खपवून घेतला जाणार नाही.असा इशारा नियोजन समितीच्या व वारकरी सांप्रदायाचे या वतीने देण्यात आला.यापुढे उत्सव समितीचे नियोजन करण्यात येईल.असेही सांगण्यात आले.
राजकीय पुढार्यांनी महाराजांचे आशिर्वाद जरुर घ्यावे.पण त्यांच्या नावाचा आणि सोहळ्याचा वापर राजकारणात करु नये. वसंतराव मानकुमरे हे सोहळा वगळता केव्हाही फिरकत नाहीत.अशी टिका करण्यात आली.पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराजांच्या या कर्मभूमीत सातत्याने भजन व किर्तन सुरू असते.अशा वारकर्र्यांचा या कार्यक्रमात कोठेही नामोल्लेख केला नसल्याची खंत ही या पञकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. दत्ताञय महाराज कळंबे जावली सहकारी बॅंक, पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.या सांप्रदायिक कार्यक्रमासाठी तीन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.परंतू प्रत्यक्षात अवास्तव खर्च दाखवला जातो. तो काय हाल,तुरे फटाक्यांसाठी की अन्य कशासाठी असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी ट्रष्टचे अध्यक्ष व नियोजक शंकर बेलोशे,विनोद विठ्ठल कळंबे, भीमराव रांजणे, संतोष बेलोशै रुईघरचे माजी सरपंच , अंकुश बेलोशे,वसंत रांजणे, एकनाथ जाधव, जगन्नाथ आमराळे,वापूराव गोळे पान,विनेकरी गणपत बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, विश्वास जाधव.उपस्थित होते.