Sunday, April 5, 2026
HomeTop Newsविकासकामांसाठी कुडाळच्या उपसरपंचांची खासदारांकडे धाव

विकासकामांसाठी कुडाळच्या उपसरपंचांची खासदारांकडे धाव

  

कुडाळ – कुडाळ गावातील स्मशानभूमी,पिंपळबन,संरक्षक भिंत यासह विविध कामांसाठी कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना निधी देण्याबाबत साकडे घातले.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचीही भेट घेतली.

             कुडाळ येथील समाजाभिमुख असणार्या या सर्व कामांसाठी खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी  रमेश गुरव , महेश पवार,  महेश कदम . उपस्थित होते.

             गेली अनेक वर्षे कुडाळमध्ये स्मशानभूमीचा प्रकल्प विविध कारणांनी रखडलेला आहे . सध्या असणार्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे.दर वर्षी येणार्या पुराच्या पाण्यामुळे स्मशानभूमीचे नुकसान होते. याठिकाणी संरक्षक भिंत, घाटाचे बांधकाम तसेच प्रतिक्षालय होणे आवश्यक आहे. त्याच्यावर त्वरित मार्ग काढणे तसेच पिंपळबन उद्यानाच्या अनुषंगाने विविध विकास कामांची पूर्तता करणे व गावात इतरत्र संरक्षक भिंत व रस्त्याच्या कामासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली . उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांबाबत कुडाळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page