Friday, April 3, 2026
HomeTop Newsशासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी. ना. शिवेंद्रसिंहराजे.  वसंतराव मानकुमरे...

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी. ना. शिवेंद्रसिंहराजे.  वसंतराव मानकुमरे यांच्या संकल्पनेतून कावडीचा झालेला विकास दिशा देणारा


सूर्यकांत जोशी कुडाळ – केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
      जावली तालुक्यातील कावडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज ग्राम अभियान, कावडी ग्रामपंचायत विकास उत्सव आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.   
           कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे , उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य वसंतराव मानकुमरे, अजित साळुंखे, सौ. जयश्री गिरी, जावली पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक,माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती रविंद्र परामणे, तानाजी शिर्के, हणमंतराव पार्टे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे.जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे,भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने, अभिनेत्री संजना काळे, अभिनेते संदीप पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्यात जावळीला अनन्य साधारण महत्व असल्याची इतिहासात नोंद आहे.त्यामुळे “ज्याच्या हाती जावली त्याच राज्य सुरक्षित” या ऐतिहासिक विचार करता भविष्यात मतदारसंघ पुनर्रचना झाली तरी जावली आमच्याकडे राहील अशी व्यवस्था करणार . त्याच बरोबर कोणी फंद फितुरी करणारा चंदरराव असेल तर त्याचा बंदोबस्त करायचे औषध मानकुमरे भाऊंच्या कडे उपलब्ध असल्याचा इशारा विरोधकांना दिला.
      यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांच्या सन्मानार्थ प्रातिनिधिक स्वरूपात महिलांचा सन्मान करण्यात आला.तसेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.प्रारंभी मानकुमरे भाऊंच्या नेतृत्वाखाली कावडी ग्रामस्थांनी  उंट, हत्ती, घोडे यांच्या सह केलेल्या अनोख्या स्वागताने उपस्थित मान्यवर भारावून गेले. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


        शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेल्या नरेटिव्ह मुळे जावळीत काही ठिकाणी अगदी अल्प मताने धोका झाला. असे असले तरीही  जावली ही केवळ माझी राजकीय जबाबदारी नाही, तर माझ्या भावनांशी जोडलेली आहे. जावली आणि सातारा परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, पायाभूत सुविधा, ग्रामविकास आणि महिला सशक्तीकरणासाठी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली .मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वसंतराव मानकुमरे यांची संकल्पना, चिकाटी आणि ग्रामस्थांची साथ प्रशंसनीय आहे. त्यांना या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल असा विश्वास ना. शिवेंद्रसिंह राजेंनी व्यक्त केला.
महिलांनी  आरोग्याकडे लक्ष द्यावे -प्रिया शिंदे
       महिलांनी आर्थिक उन्नती बरोबरच आपल्या कुटुंबातील लोकांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन वापरात असणारे तेल व नैसर्गिक खाद्यपदार्थ यामुळे अकाली हार्ट अटॅक कॅन्सर यासारखे रोग उद्भवत आहेत त्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी आरोग्यम् धनसंपदा हे सूत्र लक्षात घेऊन आपली प्रगती साधावी असा मौलिक सल्ला दिला.
नामदार शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली जावळीचा चौफेर विकास -वसंतराव मानकुमरे
       गेल्या दहा वर्षात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे जावली तालुक्यात झालेली आहेत. आज गावोगाव पक्के रस्ते होत आहेत. याशिवाय लवकरच महू व हातगेघर  धरणाचे पाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात पोहचणार आहे. जावली तालुक्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. महाबळेश्वर व पाचगणी कडील पर्यटक भिलार, सायघर मार्गे जावलीतील महू व हातगेघर या परिसरात येऊन पर्यटनाचा लाभ घेऊ शकतील त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचाच भाग घेऊ म्हणून कावडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध गाव स्पर्धेत भाग घेऊन गावाचे सुशोभीकरण तसेच आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध केले आहेत. या स्पर्धेत शासनाने लावलेले निकषात कावडी गावाने शंभर गुण मिळवले असून या निकषापेक्षा सुद्धा अधिक काम कावडीने केले आहे. त्यामुळे या स्पर्धेत पाच कोटीचे बक्षीस कावडीलाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


    

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page