शुक्रवारी रात्री उशिरा आणखी १६ जणांचा अहवाल कोरोना बाधित –
एकूण – १८०१, डिस्चार्ज १३९०, बळी ४४ ,अँक्टिव्ह ३६७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात १६ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये अँन्टीजेन टेस्ट मध्ये निझरे १, सोनगाव १,कुसुंबी १, केळघर तर्फ सोळशी २,सर्जापूर २, व प्रायव्हेट लँब च्या अहवालात घोटेघर येथील ८ व कुडाळ येथील १ यांचा समावेश आहे. शनिवारचे अहवाल रात्री दहा पर्यंत आले नाहीत.
प्रशासनाच्या प्रयत्नाने कोरोना योद्धाचे रुग्णालयाचे बील माफ करण्यात यश
कुडाळ येथील एक अंगणवाडी सेविका कोरोना बाधित झाली होती त्यांचेवर पांचगणीच्या बेलीयर रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णालयाने त्यांना ७८ हजार रुपयांचे बील आकारले होते. त्यामुळे संबंधित अंगणवाडी सेविकेपुढे बील भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब समजताच तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी प्रयत्न करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून सदर कोरोना योद्धाचे पूर्ण बील माफ करुन घेतले.त्यामुळे या कोरोना योद्ध्याला दिलासा मिळाला आहे. दरम्यान यापुढेही कोरोनाच्या शासकीय कामात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी कोरोना बाधित झाल्यास त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जसजसे अन् लाँक होत आहे तसतशी कोरोना बाधितांचे आकडेवारीत सुद्धा वाढ होत आहे. एखाद्या जणसमुहात एक जरी कोरोना बाधित आला तर त्या समूहातील बहुतांश जणांना संसर्ग होत असल्याचे गेल्या सहामहिन्यात सर्वांनाच अनुभवले आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील बहुतांश लोकांचे अहवाल कोरोना बाधित आले.ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे अशा कोरोना बाधितांना आजाराची लक्षणे फारशी जाणवली नाहीत. परंतु प्रतिकार शक्ती कमी असणारे तसेच पूर्वीच्या काही आजाराची लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधितांची अवस्था अत्यंत नाजुक बनली तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.
कोरोनावर अजुनही लस उपलब्ध नाही. आणि केव्हा येईल हे अजूनही कोणी ठाम सांगितले नाही. त्यामुळे कोरोना पासून स्वतः चे व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला नियम पाळून जबाबदारी घ्यावी लागणार आहे.