Thursday, February 19, 2026
HomeTop Newsशेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाने सुरू राहिलेच पाहिजेत - आ.शशिकांत शिंदे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाने सुरू राहिलेच पाहिजेत – आ.शशिकांत शिंदे.

प्रतापगड कारखाना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सूर्यकांत जोशी कुडाळ – ऊस उत्पादकांच्या हितासाठी प्रतापगड व जरंडेश्वर कारखाना सुरू राहणे आवश्यक आहे.कारखाना कुणाचा आणि त्यांनी काय केले.यापेक्षा कारखाने सुरू राहिले पाहिजेत.ईडीने कारवाई करून जरंडेश्वर कारखाना बंद ठेवल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.शेतकर्यांच्या हितासाठी कारखाने सुरू राहण्यासाठी लढाई लढावीच लागेल असे प्रतिपादन माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले.

      कुडाळ येथे उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे बोलत होते. मेळाव्याला माजी सभापती बापूराव पार्टे, मोहनराव शिंदे,माजी उपसभापती तानाजीराव शिर्के यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतापगड कारखाना चालविण्यास आम्ही समर्थ

आ. शिंदे. म्हणाले ,        प्रतापगड कारखाना चालविण्यास किसनवीर कारखान्याने घेतला माञ त्यांनी तो बंद ठेवल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.ऊसाला चांगला भाव व काटा न मारणारा कारखाना ऊस उत्पादकांना हवा आहे.प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालविण्यास आम्ही समर्थ आहोत.किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसलेंनी कारखाना सुरू करणार नसतील तर करार मोडावा.शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.यावर्षी कारखाना बंद ठेवल्यास आपण स्वतः टाळे तोडणार असल्याचा इशारा आ.शिंदे यांनी दिला.           

             यावर्षी जावलीतील ३१ हजार टन ऊस जरंडेश्वर कारखान्याने नेहला.ईडीची भिती आता अनेकांनी घेतली आहे.रोज एकावर कारवाई होत आहे.कारखाना कुणाचा हे महत्वाचे नाही.कारखाना सुरू राहणे आवश्यक म्हणूनच मेळावा घेण्यात आला आहे.पुढील हंगामासाठी शेतकर्यांनी जरंडेश्वर कारखान्यांकडे नोंद केली आहे.परंतू आता ईडीच्या कारवाईने कारखाना बंद राहिल्यास अडचणी वाढणार आहेत.पंधरालाख टन ऊस गाळप करणारा कारखाना बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार म्हणूनच हा कारखाना सुरू राहण्यासाठी ही लढाई लढावीच लागेल.

जावलीतील शेतकऱ्यांना वेठीस धरणे महागात पडेल

       जावली चे आमदार  मत पाहुन ऊस तोड देत आहेत.शेतकर्यांनी  कष्टाने पिकविलेला ऊस नेहण्यासाठी कारखानाप्रमुखांपुढे अक्षरशः लोटांगण घालावे लागत आहे.प्रत्येक शेतकऱ्याला राजकीय तराजुत तोलून त्याला  निष्ठेची सत्व परीक्षा द्यावी लागते. अशी टीका माजी सभापती मोहनराव शिंदे यांनी केली.

          या  राजकीय कारखानदारांकडुन गावोगावी आपले एजंट नेमून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले.नोंदी करून ऊस नेमणार नसाल तर नोंदीही करू नका अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.ही लाचारी शेतकरी फार काळ सहन करणार नाही.जावली तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जोरदार मागणी ऊस उत्पादकांनी केली.

            जयवंत शिवणकर, महेश पवार, बुवा साहेब पिसाळ, शिवाजीराव पवार, यांनी शेतकर्यांचा अडचणी मांडल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page