कुडाळ : येथील श्री. पिंपळेश्रर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी चंद्रसेन सुरेशराव शिंदे व व्हा.चेअरमन पदी ज्ञानेश्वर भाऊ कुंभार यांची निवड नुकतीच बिनविरोध करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विशाल भोसले होते.
सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय विलास कदम, शामराव गुलाबराव शिंदे, अरुण रामचंद्र किर्वे,सतीश विजयसिंह शिंदे, विरेंद्र सुरेशराव शिंदे, उत्तम शंकर देवकर,विमल रमेश शिराळकर ,सलामत सिकंदर मणेर, सुनील गणपत रासकर , विलास गणपत कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
मी १९९६रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने आपल्या सभासदांना पतपुरवठा करुन त्यांच्या अनेक गरजा पुर्ण करुन मदत केली आहे सभासदाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आलेली आहे स्थापनेपासून या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होत आली आहे .कोरोना सारख्या माहामारीच्या काळात संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत लोकांना सहकार्य केले आहे यामुळे लोकांचा फार मोठा विश्वास या संस्थेने संपादन केला आहे.संस्थेचे पिग्मी कलेक्शन श्री. चंद्रकांत ननावरे व श्री. शंकर कुंभार हे करत आहेत .सचिव म्हणून श्री. अजित रमेश शिराळकर व कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड.सतीष प्रकाशराव शिंदे काम पाहत आहेत.
