Sunday, April 5, 2026
HomeTop Newsश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान  दुर्गामाता दौड – युवा पिढीचे प्रेरणा स्थान :       देव...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान  दुर्गामाता दौड – युवा पिढीचे प्रेरणा स्थान :       देव देश आणि धर्म जागृतीची प्रेरणा: कुडाळची दुर्गामाता दौड

सूर्यकांत जोशी कुडाळ – दरवर्षी कुडाळ तालुका जावली येथे घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान  कुडाळ शाखेच्या वतीने दररोज सकाळी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. देव देश आणि धर्मासाठी पुढील  पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने अनेक तरुण, मुले, मुली धारकरी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात. हिंदू धर्माचा भगवा ध्वज अग्रभागी ठेवून त्यापुढे हलगी वाद्याच्या साह्याने संपूर्ण गावातून ही दररोज ग्रामप्रदक्षणा करते. यावेळी या धर्म ध्वजाचे गावातील महिला औक्षण करून स्वागत करतात.
आजच्या वेगवान युगात समाजाला शारीरिक, मानसिक व सांस्कृतिक बळ देणाऱ्या उपक्रमांची नितांत गरज आहे. त्यातच परंपरा, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम घडवणारी उपक्रममाला घडवली तर युवा पिढीला नवे बळ मिळते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची दुर्गामाता दौड हाच एक अद्वितीय उपक्रम आहे.

दुर्गामाता दौड म्हणजे फक्त प्रभात फेरी अथवा पळणे नाही, तर आपल्या धर्म व दुर्गसंस्कृतीचा स्मरणोत्सव आहे. प्रत्येक गावातून व गड-किल्ल्यांच्या अंगणातून निघालेली ही दुर्गामाता दौड युवांना इतिहासाच्या मातीशी जोडते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्यासाठी झगडलेल्या मावळ्यांच्या धाडसाची आठवण करून देते. ही फक्त क्रीडा नाही, ही आहे ‘शौर्य आणि संस्कृतीची सांगड’ घालणारी प्रेरणा. 



   युवकांसाठी ही दुर्गामाता दौड म्हणजे आरोग्य, तंदुरुस्ती आणि संघटनशक्तीचे धडे. सकाळच्या ताज्या हवेत गडांवर पळताना मनात देशभक्तीची ज्वाला पेटते. आधुनिक जीवनशैलीत जेथे मोबाइल, इंटरनेट, सोशल मिडियाच्या आहारी गेलेली पिढी आहे, त्यांना ही दुर्गादौड शरीर-मनाला चैतन्य देऊन ‘स्वत्व शोधण्याची वाट’ दाखवते.

आदरणीय संभाजी राव भिडे गुरुजी यांनी संस्थापक श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून सुरु केलेल्या या उपक्रमातून एक संदेश स्पष्ट जाणवतो –
???? शारीरिक सुदृढता हीच मानसिक शक्तीची गुरुकिल्ली आहे.
???? इतिहासाचे स्मरण हेच भविष्याच्या वाटचालीचे प्रेरणास्थान आहे.
???? एकत्रित ध्येयाने पळणारे पाय समाजाला पुढे नेणाऱ्या विचारांचे

प्रतीक आहेत.आज या उपक्रमामुळे असंख्य युवक धर्म वाव दुर्ग संस्कृतीचे संवर्धक बनत आहेत. फक्त खेळ म्हणून नाही, तर जीवनमूल्यांची जाणीव करून देणारी ही दुर्गामाता दौड खरीखुरी “युवा पिढीची प्रेरणास्थान” ठरत आहे.  श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी गडकोट मोहिम , छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास आणि नवरात्र मध्ये नऊ दिवस दुर्गामाता दौड हे उपक्रम  राबवले  जातात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page