Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसंस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आ.शशिकांत शिंदे

संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आ.शशिकांत शिंदे

सूर्यकांत जोशी कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपण संस्थापक सहकार पॅनलच्या सोबत ठाम आहे.अधिवेशनामुळे आपण प्रचारासाठी येऊ शकलो नाही.याचा चुकीचा अर्थ काढुनी विरोध सभासदांची दिशाभूल करत आहेत.या निवडणुकित संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी  केले आहे.

            प्रतापगड सहकारी साखर कारखाना ही जावली तालुक्याची अस्मिता आहे.माजी आमदार लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी अथक प्रयत्न करून हे सहकार मंदिर उभे केले आहे.आदरणीय नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या गळीत हंगामात उपसभापती सौरभ शिंदे व आपण कारखाना सुरू करणार आहोत.प्रतापगड कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.याची जाणीव आम्हा सर्वांना आहे.

          विरोधकांच्या भूलथापां पासून सभासदांनी स्वतः चा बचाव करुन संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन आ.शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page