Sunday, April 5, 2026
HomeTop Newsसभासदांच्या आग्रहा मुळेच प्रतापगड कारखाना बचाव पॅनल चे नेतृत्व ; दिपक पवार

सभासदांच्या आग्रहा मुळेच प्रतापगड कारखाना बचाव पॅनल चे नेतृत्व ; दिपक पवार

सत्तेवर आल्यास पवार साहेबांच्या हस्ते दसर्याला मोळी पूजन ; दिपक पवार

सूर्यकांत जोशी कुडाळ – आम्ही प्रतापगड कारखान्याचे सभासद नाही .परंतू आम्ही दिल्ली तालुक्यातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहोत.मतदार संघातील जनतेच्या अडचणी तसेच जनतेच्या मालकीच्या सहकारी संस्था बाबतच्या अपेक्षा पाहणे आमची जबाबदारी आहे.प्रतापगड सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.विद्यमान संचालकांना गेल्या वीस वर्षांत कारखाना चालविता आला नाही त्यामुळेच या कारखान्याच्या सभासदांनी आपणास कारखाना बचाव पॅनल चे नेतृत्व करण्याची साद घातली म्हणूनच सभासद व कामगारांच्या हितासाठी या निवडणुकीत उतरलो आहे .सत्तेची संधी दिल्यास येत्या दसर्याला मोळी टाकण्यासाठी आदरणीय नेते शरद पवार यांना प्रतापगड कारखान्या वर आणणार असल्याचे प्रतिपादन कारखाना बचाव पॅनल चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी केले.

             प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कुडाळ येथे  बचाव पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत दिपक पवार बोलत होते.

               यावेळी बोलताना सुधीर पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली, ते म्हणाले,कारखान्यावर आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी शरद पवारांकडे धाव घेता.मग विधानसभा निवडणुकीत भर पावसात भिजत शरद पवारांनी दिपक पवारांना निवडुंन देण्यास सांगितले होते.त्यावेळी तुम्ही काय केले हे पवार साहेबांना चांगलेच ठाऊक आहे.त्यामुळेच पवार साहेबांनी दिपक पवारांना काही सांगितले नाही.

               आम्ही कारखान्याचे सभासद नाही म्हणता म्हणता मग तुमच्या बॅनर फोटो असणारे व तुमच्या पॅनलचे नेतृत्व करणारे तिन्ही आमदार  कारखान्याचे सभासद आहेत का. असा सवाल सुधीर पवार यांनी विचारला.आम्ही आदरणीय लालसिंगराव शिंदे काका व राजेंद्र शिंदे यांचे राजकीय विरोधक नक्कीच होतो. पण त्यांच्या सहकारी संस्थांना कधीही विरोध केला नाही.आदरणीय साहेबराव पवार यांनी येथील युवकांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक संस्था सुरू केली.तर लालसिंगराव शिंदे यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी तसेच युवकांच्या हिताचा निर्णय घेतला.परंतू त्यांच्या पश्चात या कारखान्याची वाताहत झाली.त्याला जबाबदार कोण.तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवला असता तर आम्हाला निवडूक लढवायची वेळच आली नसती. आम्हू शेतकरी, सभासद व कामगारांना न्याय मिळवून देऊ असेही सुधीर पवार यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page