Sunday, April 5, 2026
HomeTop Newsसर्वसामान्य जनतेला स्थानिक नेतृत्वाकडून  अपेक्षा : "नको श्रेयवाद –नको वादविवाद: द्या खरे...

सर्वसामान्य जनतेला स्थानिक नेतृत्वाकडून  अपेक्षा : “नको श्रेयवाद –नको वादविवाद: द्या खरे विकासकाम”

सूर्यकांत जोशी कुडाळ –  सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत,ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय आरोप,प्रत्यारोप, कुरघोड्या,श्रेयवाद अशा प्रकारच्या विविध रंगांनी आता राजकीय वातावरण ढवळू लागले आहे. राजकीय पक्षांना व नेत्यांना सत्तेची खुर्ची हवी आहे तर जनतेला पायाभूत सुविधा आणि विकासकामांची अपेक्षा आहे.

             गावोगावी स्थानिक नेतृत्वाकडून विकासाच्या गाजावाजा होत असतात. मात्र सर्वसामान्य जनतेचा चा ठाम सूर असा आहे की, “आम्हाला हवे ठोस विकासकाम, नको राजकारण आणि नको वादविवाद ”. मंजूर कामांच्या श्रेयवादासाठी होणाऱ्या स्पर्धेपेक्षा गावाला आवश्यक असलेली सोयीसुविधा प्रत्यक्षात याव्यात, हीच खरी मागणी जनतेतून केली जात आहे.

जनतेच्या अपेक्षा अशा –

1️⃣ स्वच्छ पिण्यायोग्य पाणी : प्रत्येक घराघरात शुद्ध व मुबलक पाणी.

2️⃣ रुंद व स्वच्छ रस्ते : वाढत्या वाहन संख्येला तोंड देण्यासाठी अतिक्रमणमुक्त, रुंद रस्ते व डांबरीकरण.

3️⃣ सांडपाणी व्यवस्थापन : प्रदूषित पाणी नदी, विहिरी, नाले यामध्ये मिसळणार नाही, अशी प्रभावी ड्रेनेज व्यवस्था.

4️⃣ क्रीडा सुविधा : मुलांसाठी मैदान, स्विमिंग पूल, प्रशिक्षित प्रशिक्षक व राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांसाठी आवश्यक सुविधा.

5️⃣ महिला कौशल्य विकास : महिलांसाठी कौशल्य विकास केंद्रे, स्वयंरोजगार व प्रशिक्षण संधी.

6️⃣ बाग-बगीचा व सांस्कृतिक केंद्र : बालोद्यान, सांस्कृतिक केंद्र, वाचनालय, ग्रंथालय उभारणी.

7️⃣ शैक्षणिक सुविधा : गावात उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे.

8️⃣ रोजगार निर्मिती : स्थानिक पातळीवर लघुउद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, हस्तकला उद्योग उभारणी.

9️⃣ बाजारपेठ विकास :

  • आधुनिक शॉपिंग आर्केड, स्वच्छ व सुसज्ज स्टॉल्स.
  • ग्राहकांना आकर्षण वाटेल अशा सुविधा – पार्किंग, पिण्याचे पाणी, डिजिटल पेमेंट व्यवस्था, एटीएम.
  • शेतकरी व स्थानिक उत्पादनांसाठी स्वतंत्र जागा व शेतकरी बाजार.
  • पर्यटनस्थळांच्या जवळ असल्यास पर्यटन केंद्र, स्थानिक उत्पादन विक्री केंद्रे.

???? आरोग्य सुविधा : प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक उपचार साधने, आपत्कालीन सेवा व मातांसाठी-लहान मुलांसाठी विशेष उपचार केंद्र.

1️⃣1️⃣ सुरक्षा व डिजिटल सुविधा : सीसीटीव्ही, फ्री वाय-फाय झोन, डिजिटल लायब्ररी.

1️⃣2️⃣ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय व इंटरनेट सुविधा.

???? सर्वसामान्य जनतेचा ठाम प्रश्न असा आहे की, “मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्यात स्थानिक नेतृत्व व्यस्त राहणार की आमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात?”
खरे नेतृत्व हे घोषणांनी नव्हे तर प्रत्यक्ष कामाने दिसले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page