Thursday, February 19, 2026
HomeTop Newsसांगता सभेत सभासदांच्या गर्दीने संस्थापक पॅनलच्या विजयावर केले शिक्कामोर्तब

सांगता सभेत सभासदांच्या गर्दीने संस्थापक पॅनलच्या विजयावर केले शिक्कामोर्तब

सौरभ शिंदे यांच्या अभ्यास पूर्ण भाषणाने उपस्थित प्रभावित

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली.कारखान्याच्या संस्थापक सहकार पॅनलच्या कुडाळ येथे झालेल्या सांगता सभेला सभासदांची विक्रमी  गर्दी झाली होती.सभासदांच्या या गर्दीने संस्थापक सहकार पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा उपस्थितांत होती. 

         या सभेला तालुक्यातील सर्व नेते व सहकारी संस्थांचे पदाधिकारी गटतट मतभेद विसरून उपस्थित होते. 

          सौरभ शिंदे म्हणाले, काकांच्या व भैय्यांच्या अनुपस्थित तालुक्यातील सर्व  मान्यवरांनी पाठबळ दिले.तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आदरणीय काकांनी प्रतापगड कारखान्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न राजेंद्र शिंदे यांनी पूर्ण केले.कारखान्याच्या उभारणीसाठी माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी सहकार्य केले.२००२ साली तालुक्यात ऊसाचे क्षेत्र अपुरे होते.महू हातगेघर धरणाचे काम रखडल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले नाही.आगामी काळात ऊसाचे अपेक्षित उत्पादन होऊन कारखाना सुरळीत चालेल.आठ वर्षांपूर्वी लिलावापासून कारखाना वाचवण्यासाठी यश आले.

          आज जाणीव पूर्वक निवडणूक लावली आहे.ज्यांनी निवडणूक लावली त्यांचा कारखान्याशी कोणताही संबंध नाही.तालुक्यातील सर्व मान्यवरांनी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भूमिका घेतली.असे असताना कोणतीही जाणीव नसताना दोन्ही बंधू निवडणुक लावून काहीही बरळत आहेत.आज पर्यंत सोमय्या ग्रुप, सोमेश्वर कारखाना हे आपला करार कालावधी पूर्ण करुन गेलेत.किसनवीर कारखान्यासोबत ५१ कोटी साठी सोळा वर्षांसाठी घेतला आहे.पाच वर्षं त्यांनी कारखाना चालविला.कारखाना बंद राहिला ही किसनवीर सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी आहे.

          आज  किसनवीर कारखाना प्रतापगड चालवू शकत नसल्याने आम्ही  हिशोब करुन तो चालविण्यासाठी मागितला आहे.कारखाना सोडवुन घेतला तरी तो चालविण्यासाठी सक्षम पणे निर्णय घ्यावा लागणार आहे.याचा सारासार विचार केला आहे.आमच्याकडे काही ठोस कार्यक्रम आहे.विरोधक केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

      जे स्वतः ची संस्था वाचवू शकले नाहीत ते कारखान्याचा बचाव काय करणार असा सवाल करुन ज्या ठिकाणी आपला काही संबंध नाही अशा ठिकाणी निवडणूक लावली आहे.कारखान्याचे कामगार आजही आमच्या सोबत ठाम आहेत.कामगारांना त्यांचा पगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहिलो आहे.शेतकर्यांना ऊसाचे बील वेळेवर मिळावे यासाठी आम्ही भूमिका घेतली.

         काकांचे कार्यकर्ते हे आजही तितक्याच निष्ठेने आमच्या सोबत आहेत.असे असताना विरोध मात्र दिशाभूल करत आहेत.संस्थापक सहकार पॅनलमध्ये सर्व तज्ञ उमेदवार आहेत.सुशिक्षित आहेत.आणि हे संचालक मंडळ प्रतापगड कारखाना पुढील गळीत हंगाम नक्कीच सुरू करेल असा ठाम विश्वास सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला.सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडता विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले.

       जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिपक पवार यांच्या बरोबरच किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांच्या वर सडकून टीका केली.प्रत्येक निवडणूक लढवायची हा दिपक पवारांचा धंदाच आहे.सगळ्यांनी एकत्र आल्यास कारखाना सुरू करणे शक्य आहे.

         माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या सारख्या कर्तृत्ववान व स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला आदरांजली म्हणून कारखान्याच्या या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी आपले मत देऊन विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन सदाशिव सपकाळ यांनी  केले.

जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,माजी उपसभापती रविंद्र परामणे , यांनी मनोगत व्यक्त केले.

अॅड.शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page