कुडाळ: शालेय जीवनात होणारी स्पर्धा परीक्षांची तयारी भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी उपयुक्त होते. याकरता मूलभूत गोष्टींचे पक्के ज्ञान होणे आवश्यक आहे .विद्यार्थ्यांनी सातत्य जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यश मिळवणे सहज शक्य आहे.निश्चित ध्येय ठरवून यशाचा योग्य टप्पा गाठण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. याकरता प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करायला शिकले पाहिजे.यादृष्टीने जावळीतील शिक्षकांचे शैक्षणिक ,सामाजिक योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन जावली तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले
जावली तालुका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त सभासद यांच्या गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मेढा अशा दोन ठिकाणी मर्यादित उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला होता
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी रमेश काळे ,गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव ,पतसंस्था चेअरमन धिरेश गोळे, अखिल भारतीय संघटनेचे नेते दीपक भुजबळ, जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अनिल पिसाळ ,उपाध्यक्ष गजानन वारागडे ,जावली तालुक्याचे अध्यक्ष सुरेश चिकणे , सरचिटणीस तानाजी आगुंडे, कार्याध्यक्ष विजय बांदल, उपाध्यक्ष सुनील शिंदे ,ज्ञानेश्वर शिर्के, केंद्रप्रमुख अरविंद दळवी ,संपत धनवडे ,विजय देशमुख,, अलका सपकाळ, मिलिंद जगताप ,हंबीरराव जगताप,सुरेश शेलार, संपत शेलार, संजय आटाळे, शंकर दळवी ,सुरेश पार्टे, अतुल बोराटे, मदन बोराटे, सुनील माळवदे ,समीर आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते
गटविकास अधिकारी रमेश काळे ,राज्यध्यक्ष उदय शिंदे,किरण यादव,सुरेश चिकणे,प्रकाश धनावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव म्हणाल्या विद्यार्थ्यांसाठी पतसंस्थेने राबवलेला स्तुत्य उपक्रम आहे. शिक्षणातून चांगला माणूस व्हायला शिकलं पाहिजे. आपलं मन संवेदनशील जागृत ठेवून मुंगीचा आदर्श घेत मधमाशी प्रमाणे जगायला हवे.आजच्या मोबाईल जमान्यात पुस्तकाशी मैत्री जुळवून वाचनाचा व्यासंग वाढायला पाहिजे.याकरीता निसर्गाची वृत्ती अंगीकरून आपल्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म पत्करणाऱ्यांचा सन्मान करायला हवा.
धिरेश गोळे यांनी प्रास्ताविक केले. नितीन मोहिते, शामराव जुनघरे यांनी सूत्रसंचालन केले .नथुराम पोफळे यांनी आभार मानले.
सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास हमखास यश मिळेल – तहसीलदार पोळ
- Advertisment -

