Monday, April 6, 2026
HomeTop Newsसायगावात डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांना 'संविधान 'फ्रेमचे वाटप

सायगावात डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांना ‘संविधान ‘फ्रेमचे वाटप

                              कुडाळ दि.३ :   आपल्या प्राणाची बाजी लावून भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रमाणे,वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर मंडळी काम करीत आहेत.  प्रत्येक डॉक्टर आज कोरोना काळात देवदूत ठरले आहेत,त्यांच्या कार्याला सलाम म्हणून जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने सायगाव ता जावळी येथे डॉक्टर डे निमित्त संविधानाची फ्रेम वाटप करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संदीप माने यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कारही करण्यात आला.

 डॉक्टर्स डे निमित्त जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने सातारा, जावळी,वाई, कराड,कोरेगांव,खंडाळा ,कराड,पुसेगाव,सह ठिकठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचा सविंधान फ्रेम तसेच सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोहिया विद्यालय सायगावचे माजी प्राचार्य नंदकुमार जगताप,सायगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सोनल मुंढेकर,डॉ अजय वाडते, संस्थेचे जिल्ह्यअध्यक्ष जयदीप भोसले,जावळी तालुका अध्यक्ष रविंद्र कदम,अनिता गायकवाड़,उधोजक अमर गायकवाड़,प्रशांत गुजर,स्वप्निल मांढरे,उर्मिला कदम,उमेश मोरे,अनुकूल चिकाटे यांच्यासह जयहिंद फॉउंडेशनचे सदस्य उपस्थित होते,

    यावेळी सत्कारास उत्तर देताना सायगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोनल मुंढेकर यांनी, जवानांसाठी काम करणाऱ्या जयहिंद फॉउंडेशनच्या वतीने घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले सविधान देवून वेगळ्या पद्धतीने गौरव करण्यात आला आहे. महिला वर्गाला प्रेरणा देणारा आहे,याप्रसंगी सायगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते ,यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले,तर आभार धनंजय गोरे यांनी मानले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page