???? फोटो – मेढा येथे सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, आशिष बारकुले,संदीप परामणे, हणमंत कोळेकर आदी मान्यवर.
सूर्यकांत जोशी कुडाळ : “राज्याचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे आहे. जनतेच्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाचे लाभ पोहचले पाहिजेत, हीच खरी सरकारची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मेढा येथील कलश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते.
शासन योजनांचा प्रत्यक्ष लाभ
या उपक्रमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेसमोर सादर होत असून, पाणंद रस्ते, वारसनोंदी, घरकुले, अनुदानित अवजारे, आयुष्यमान भारत कार्ड, तगाई बोजा यांसारखी अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे ना. भोसले यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की –
लक्ष्मी मुक्ती योजना, वारसनोंदी, मयत नोंदी आदींमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
नवे रस्ते क्रमांकित झाल्याने त्यावर शासन खर्च करता येणार आहे.
लागवडीयोग्य क्षेत्र नोंदविल्याने शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होईल.
घरकुल योजना व आपत्ती व्यवस्थापन
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना अशी आहे की एकही व्यक्ती घरकुलावाचून वंचित राहू नये. म्हणूनच घरकुल योजनांना न भूतो न भविष्यति मान्यता मिळाली आहे,” असे ते म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत ते म्हणाले की, नुकसानीची भरपाई म्हणून सरकारकडून मराठवाड्यात १२ कोटी तर लातूरसाठी २४४ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. “आपत्ती अद्याप संपलेली नाही. पंचनामे तातडीने करून शासनाकडे पाठवा,” अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रक्तदानाचे आवाहन
सेवा पंधरवड्याच्या दरम्यान सुरू असलेल्या रक्तदान शिबिराचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना राष्ट्रहितासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी उपसभापती सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, सातारचे उपविभागीय अधिकारी आशिष बारकुले, जावलीचे उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे, तहसिलदार हणमंत कोळेकर, सागर धनावडे, मारुती चिकणे, संदीप परामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टॉल व वाटप सोहळा
कार्यक्रम स्थळी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, विद्युत वितरण, महिला व बालकल्याण आदी विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून माहिती दिली. शेतकऱ्यांना अवजारांचे वाटप व घरकुल प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.
प्रास्ताविक तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी केले तर स्वागत व सूत्रसंचालन नायब तहसिलदार सुनिल मुनाळे यांनी केले.

Looking for a new bookie. Thinking on mksportsbet. Any review? Does mksportsbet have good odds?