Monday, April 6, 2026
HomeTop Newsसोनगांव येथे डी पी बसवताना वीजेचा जबरदस्त धक्का बसल्याने एकजण गंभीर जखमी;...

सोनगांव येथे डी पी बसवताना वीजेचा जबरदस्त धक्का बसल्याने एकजण गंभीर जखमी; वीज वितरणच्या भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी

सोनगांव येथील बदलण्यात येत असलेली डीपी

सूर्यकांत जोशी कुडाळ -सोनगाव तालुका जावली येथील गावठाण मधील  वीज वितरण कंपनीच्या डी पी बदलायचे काम चालू असताना एका खाजगी ठेकेदाराचा कर्मचारी काम करण्यासाठी डी. पी जवळ पोहचताच. त्याला वीजेचा जोरदार धक्का बसल्याने तो सुमारे पंचवीस फूट दूर फेकला गेला.संबंधित कामगार गंभीर जखमी असून त्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

              याबाबत घटनास्थळावरून प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ,सोनगांव येथील एक विद्यूत जनित्र – डी.पी. खराब झाल्याने काही भागातील वीज गेले आठ दिवस बंद होती.याबाबत सोनगांव ग्रामस्थांनी वीज वितरणच्या विभागीय कार्यालयाकडे खराब डीपी बदलण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार येथील डीपी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते.परंतु याठिकाणी वीज वितरणचा कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यावेळी संबंधित कामगार त्याच्या सोबत असलेल्या सहकार्यानी   विद्युत सप्लाय बंद केला केला आहे का याबाबत वीजवितरणच्या कार्यालयात तीन वेळा विचारणा  केली . त्यावेळी सोनगाव येथील वीजवितरणच्या ऑफिस मधील वरिष्ठ तंत्रज्ञ श्री अमोल कांबळे यांनी फोनवरून टेम्पररी कर्मचारी नागेश शिंदे यांना सप्लाय बंद केला आहे असे सांगितले .त्यानंतर वाई येथील संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा कामगार सोनू राजेंद्र आठवली यांनी काम करण्यासाठी डीपीवर वर चढून काम करण्यास सुरुवात केली परंतु त्यांना लगेच जोरात विद्युत शोक लागल्यामुळे बाजूला जवळपास पंचवीस फूट फेकला गेला. या वेळी या ठिकाणी वीजवितरणच्चा कोणताही  अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता .वीजवितरणच्या च्या  निष्काळजी कामकाजामुळे एका गरीब कामगाराचा हकनाक बळी गेला असता.याबाबत चौकशी करुन  यात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयुर देशमुख व सोनगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

       याबाबत वीजवितरणच्या कुडाळ कार्यालयाचे सहा.अभियंता वंजारी यांचे कडे विचारणा केली असता.संबंधित कर्मचारी वीज बंद केल्या बाबतची सूचना मिळण्यापूर्वीच त्याठिकाणी काम सुरू करण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.तर सदर ठिकाणचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु कोणाच्या तरी इन्व्हर्टर अथवा जनरेटरचा वीज प्रवाह याठिकाणी आल्याने संबंधीत व्यक्तीला सौम्य धक्का बसला असावा. असे एका वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांने सांगितले.

        यापूर्वी सरताळे या ठिकाणी एक अवैध वीज जोडणी करताना एका खाजगी कामगाराचा जीव गेला होता. परंतू हे प्रकरण आपसात मिटवण्यात आल्याची चर्चा आहे.असे असताना पुन्हा अशाच भोंगळ कारभारामुळे एका खाजगी कामगाराच्या जीव थोडक्यात बचावला.त्यामुळे वीज वितरणच्या वरीष्ठ अधिकार्यांनी अशा कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page