जयदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय्य सहाय्यक मयुर देशमुख यांच्या पँनेलचा आमदाऱ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कटटर समर्थक व जावळी बाजार समितीचे माजी उपसभापती जयदिप शिंदे यांच्या अजिंक्य सहकार पँनेलने 13 – 0 असा दारूण पराभव करत एकहाथी विजय संपादन केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गावपातळीवरील असल्या तरीही हल्ली त्या कोणत्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील आहेत हे महत्त्वाचे ठरत आहेत.जावली तालुक्यात सध्या आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन आमदारांमधील वाढलेली राजकीय दरी गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही दिसून येत आहे.याचा प्रत्यय दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोनगाव सोसायटी निवडणुकीकडे संपूर्ण जावळी तालुक्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिले होते, सोनगाव सोसायटीत आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयुर देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती तर विरोधी पॅनल हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांच्यात दुरंगी लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडसाद उमटलेले यानिमित्ताने पाहायला मिळाले, आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून सोनगाव सोसायटी आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्वीय सहाय्यक मयुर देशमुख यांच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते, मात्र मतदारांनी मयूर देशमुख यांच्या पॅनलला नाकारत जयदिप शिंदे यांच्याकडे संपूर्ण सत्ता सोपवली, अजिंक्य सहकार पँनेलनच्या सर्व 13 उमेदवारांनी 30 ते 40 मतांच्या फरकाने विजय संपादित केला. विजयी उमेदवारांची नावे व मते पुढीलप्रमाणे चिकणे जगन्नाथ (164) , दुदुस्कर रामदास (154) , दुदुस्कर विजय(159) , शिंदे अमित(175) , शिंदे जयदिप(182), शिंदे नारायण(172), शिंदे रामदास(171), शिंदे सुरेश(169), चिकणे कुसुम(169), चिकणे लिलावती (163), पालकर दत्तात्रय(175), रोकडे अशोक(171), जाधव कविता(159) मतमोजणीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक जयदीप शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला व गावातून मिरवणुक काढली, यावेळी मिरवणुकीत जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, समीर आतार, सागर धनावडे यांनी सहभागी होऊन विजयोत्सव साजरा केला . विजयानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
सोसायटी निवडणुकीत दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला
सोनगाव सोसायटी ताब्यात घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले त्याचबरोबर विधानपरिषद आमदार आमदार शशिकांत शिंदे दोन्ही आमदारांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांनी सुरुवातीपासूनच निवडणूकित आपली रणनीती व्यवस्थित ठेवून आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख यांचा दारुण पराभव केला व ही सोसायटी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडे ठेवण्यात यश मिळवले
