Monday, April 6, 2026
HomeTop Newsसौरभ शिंदे आणि जावलीच्या शेतकऱ्यांवर आमदारांचे पुतणा मावशीचे प्रेम. - दिपक पवार

सौरभ शिंदे आणि जावलीच्या शेतकऱ्यांवर आमदारांचे पुतणा मावशीचे प्रेम. – दिपक पवार

विद्यमान  आमदारांनी जाणीवपूर्वक  प्रतापगड कारखान्याला मदत केली नाही. दिपक पवार 

सूर्यकांत जोशी कुडाळ – विद्यमान आमदारांना जर खरच सौरभ शिंदे आणि प्रतापगड कारखान्याचा कळवळा असता तर बॅंकेचे चेअरमन असताना कारखान्याला मदत केली असती.सौरभ शिंदे व जावलीच्या शेतकर्यांवर याचे पुतणा मावशीचे प्रेम असल्याची घणाघाती टीका दिपक पवार यांनी आ.शिवेंद्रसिंह राजे यांच्या वर  नाव न घेता .कारखाना निवडणुकीच्या सांगता सभेत बोलताना केली.

             दिपक पवार म्हणाले,माझ्या वर टीका करण्यापेक्षा कारखान्यावर बोला.तीस वर्षांत सत्तावीस वर्षे भाडेवहिवाट आहे.कारखाना भाड्याने देताना सभासदांना विचारले नाही.सहकारात परिवर्तन झाले तरच संस्थेची प्रगती होईल.हे सत्ताधारी आगामी पाच वर्षांत कारखाना विकून टाकतील. आमदार म्हणतात मी सभासद नाही. हे मान्य पण तुम्ही तरी कुठे सभासद आहात.आम्ही कारखान्याचे कामगार आणि कारखान्याचे डिझेल माझ्या गाडीला वापरणार नाही असा उपरोधिक टोला दिपक पवार यांनी लगावला.

निवडणूक म्हंटले की आरोप प्रत्यारोप केले.पण येवढ्या खालच्या पातळीची टीका केली जात नाही..कुडाळ करांचे आपल्या वर प्रेम आहे.असे दिपक पवार म्हणाले.

सुधीर पवार म्हणाले, दसर्याला बाॅईलर पेटवा अशी विनवणी करुन सभासदांनी पाठींबा व्यक्त केला.मयत सभासदांची वारस नोंद न करुन पिळवणूक केली.गेल्या पंचवीस वर्षे जे सभासदांच्या दारात गेले नाहीत ते या इलेक्शन च्या माध्यमातून गेले.त्यांचे सभासदांनी कसे स्वागत केले हे त्यांनाच विचारा.दिपक पवार ज्या पक्षात होते त्या पक्षात प्रामाणिकच राहिले.तुम्ही मात्र शरद पवारांच्या पक्षातून निवडुन आले असून आज त्यांच्या पक्षाच्या विरोधात काम करत आहात.आ.शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बॅंकेतील पराभवाला हेच जबाबदार आहेत.आजही पवार साहेबांच्या विरोधी पक्षाचे आमदार यांच्या बरोबर आहेत. वसंतराव मानकुमरे यांच्या वर सुद्धा सुधीर पवार यांनी सडकून टीका केली.

            ज्यांनी कारखाना उभारणीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले ते आज तुमच्या बरोबर आहेत का.हे जेष्ठ संचालक आपल्या सोबत का नाहीत याचा जाब द्यावा.हे संस्थापक पॅनल नसून केवळ माय लेकांचे पॅनल आहे.संस्थापक सभासद यांच्या सोबत नाही.ज्यांना वाडवडलांनी काढलेल्या संस्था चालवतात येत नाही ते आमच्या संस्थांचे नाव घेत आहेत.आम्ही संस्था काढल्या त्या आजही अस्तित्वात आहेत.आमच्या शिक्षण संस्था आजही दिमाखात सुरु आहेत.तुम्ही साधी बालवाडी सुद्धा काढली नाही.असा सणसणाटी टोला सुधीर पवार यांनी सौरभ शिंदे यांच्या वर केली.

            आमच्या विरोधात अख्खा तालुक्यातील नेते उतरलेत .पण त्यांनी यांना सभासद करुन घ्यावे.आम्ही भंगार चोर नाही आम्ही सोन्याचा घास खाणारी पैलवानांची ओलांद आहोत.म्हणूनच दीपक पवारांच्या पाठीशी सभासदांनी ठाम रहावे.

           संजय शिंदे – संस्थापक पॅनलला काकांच आणि राजेंद्र भैय्यांचे नाव घेऊन मत मागण्याचा अधिकार नाही.ज्यांनी भैय्यांचे या खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवली ते संग्राम शिंदे व जितेंद्र यांना स्थान नाही.कारखाना काय यांची खाजगी प्राॅपर्टी आहे का असा सवाल केला.

बचाव पॅनल चे उमेदवार भानुदास भोसले म्हणाले, सभासद, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठीच बचाव पॅनलचे निर्माण करण्याचा प्रामाणिक हेतू आहे.

        शिवाजीराव गायकवाड म्हणाले, कारखाना चालविण्याची मानसिकता संस्थापक पॅनलने ठेवली नाही.कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात धन्यता मानली.

       प्रकाश तथा दादा रासकर यांनी प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page