HomeTop Newsस्वराज्य  परिषदेच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार प्रेरणादाई :तारळकर

स्वराज्य  परिषदेच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार प्रेरणादाई :तारळकर

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोणताही पुरस्कार हा एक काटेरी मुकुट असतो. पुरस्कार स्विकारल्या नंतर त्याला पात्र राहण्याची जबाबदारी वाढत असतें. त्यामुळे पुरस्कारार्थीला आपल्या कामात अधिक पारदर्शक व समाजाभीमुख काम करण्यासाठी दक्ष रहावे लागते.स्वराज गुणिजन गौरव विकास परिषदेच्या माध्यमातून  क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकेल्या बद्दल दिले जाणारे पुरस्कार अधिक प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर केले.

            स्वराज्य गुणीजन गौरव विकास परिषद सातारा महाराष्ट्र आयोजित द्वितीय आदर्श शिक्षक, व्यक्ती पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा  कुडाळ, ता. जावली येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना तारळकर बोलत होते. कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य संदिप शिंदे, छत्रपती शाहू कला क्रिडा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सुनिल जाधव, जिल्हा क्रिडा समन्वयक शिवाजी निकम, महाबळेश्वर तालुका क्रिडा समन्वयक गणेश शेंडे, कुडाळचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे,उपसरपंच सोमनाथ कदम,संजय शिंदे, प्रदीप कांबळे, सुनील रासकर यात्रा कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते प्रदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

                 यावेळी सातारा जिल्ह्यातील दिपाली सुधाकर दुंदळे, दिपक रामचंद्र शिंदे,सुवर्णा कमलाकर पाठक,कमलाकर मुरलीधर पाठक, शिवाजी विष्णू शिवणकर,उषा शिवाजी शिवणकर, स्मिताराणी नेताजी घाटे,दत्तात्रय मनोहर तरडे, आणि मनमाड येथील प्रविण व्यवहारे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच किशोर अनंत बागिलगेकर (गडहिंग्लज),ओंकार राजेंद्र गोरखे (अहमदनगर),गोरख ज्ञानदेव घोडके (श्रीगोंदा), किरण शिवाजी थोरात (हातकणंगले), यश हणमंत शिंदे (अहमदनगर), संकेत संभाजी थोरात (अहमदनगर), निलेश अरविंद वाळिंबे (शिरवळ), देवीदास माने (सातारा), सतिश सुदाम सुतार (सातारा), शिवलिंगाप्पा बबलाद (पुणे) यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नितीन माधवराव तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, डॉ.गोविंद व्ही. वाळवेकर यांना जीवन गौरव पुरस्कार,तनुजा साहिल जंगम यांना विशेष उल्लेखनिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या सोहळ्यामध्ये राज्यभरातून सहभागी झालेल्या महाराजा शिवाजी हायस्कुल कुडाळ, जि. प. केंद्र शाळा कुडाळ, जि. प. शाळा सर्जापूर, मालगाव हायस्कूल मालगाव, केंजळ हायस्कूल केंजळ, तिरंगा इंग्लिश स्कूल पाचवड, शिवशंभो स्पोर्टस् अॅकॅडमी पुणे, शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल सुरुर, वाई हायस्कूल वाई, मेरी एंजल्स स्कूल सातारा, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल खंडाळा, जि.प. शाळा बिभवी, गडहिंग्लज कराटे क्लब नेसरी, ब्रिलीयंट इंग्लिश स्कूल नरंदे कोल्हापूर, ध्येय स्पोर्टस् अॅकॅडमी अहमदनगर, स्कायलाईट स्पोर्टस् अॅकॅडमी सातारा, शिरवळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शाळांतून आलेल्या, १७५ विद्यार्थ्यांना स्वराज गुणिजन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

                या कार्याक्रमाचे संयोजन अविनाश गोंधळी,अक्षय पवार, कविता गोंधळी, आप्पा मोहिते, विनोद डबडे, तेजस गायकवाड, भूषण शिंदे, आकाश कांबळे, गणेश शिंदे, प्रिती गोंधळी, अवधुत खटावकर, आसिफ शेख, साहिल रोकडे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन सुरवसे यांनी केले व आभार प्रदर्शन अजित वाडकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular