Sunday, April 5, 2026
Homeराजकीयहेमंत शिंदे यांनी उपसभापती पदाचा राजीमाना द्यावा - समिर डांगे

हेमंत शिंदे यांनी उपसभापती पदाचा राजीमाना द्यावा – समिर डांगे


कुडाळ – नैतिक जबाबदारी स्विकारून हेमंत शिंदे यांनी पहिल्यांदा जावली बाजार समितीच्या उपसभापती पदाचा व संचालक पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष  समिर डांगे यांनी केली आहे.
        डांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे कि जावली बाजार समितीचे  उपसभापती हेमंत शिंदे यांनी नुकताच ” भाजप” मध्ये प्रवेश केला आहे. राजकारणात कोणी कुठे जायचे याचे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असते. पक्षातून आजपर्यंत जेजे गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी  व डीसीसी बँकेतील नोकऱ्या टिकवण्यासाठी. खर तर आ. शशिकांत शिंदे हे असे माध्यम आहे जे झीरोला हिरो बनवतात. हेमंत शिंदे यांना कुडाळ ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये तीन वेळा अपयश आले असतानाही एका निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करून आ. शिंदे साहेबांनी हेमंत शिंदे यांना बाजार समितिमध्ये पाठवले नव्हेतर उपसभापती ही बनवले यांची त्यांना जाणीव राहीली नाही. त्यांच्याकडे जराजरी नैतिकता असेल तर त्यांनी संचालक पदा बरोबरच उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा.हिमंत असेल तर पक्ष सोडला तसे पक्षाच्या माध्यमातून मिळालेले पद ही सोडा अशी मागणी समिर डांगे यांनी केली आहे.
       शरदचंद्र पवार साहेबां प्रमाणेच आ. शशिकांत शिंदे हे कार्यकर्ता घडविणारा कारखाना आहे. आजही जावलीत त्यांच्यावर प्रेम करणारांची संख्या कमी नाही. भविष्यात त्यात नक्कीच वाढ होईल. भविष्यात नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढीसाठी साहेबांच्या नेतृत्वा खाली आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते नक्कीच प्रयत्न करू. असे श्री. डांगे यांनी  सुचित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page