Sunday, April 5, 2026
HomeTop News???? तुळशी विवाहाचे अध्यात्मिक महत्त्व ????

???? तुळशी विवाहाचे अध्यात्मिक महत्त्व ????

सूर्यकांत जोशी कुडाळ 9421214450

आपल्या धर्मशास्त्रा त आषाढी शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी संबोधले जाते. तसेच कार्तिक शुद्ध एकादशीला देवउठणी एकादशी म्हटले जाते या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात. या चातुर्मासातील आपण विविध प्रकारचे धार्मिक विधी करण्याचे टाळतात. कार्तिकी एकादशीला देव जागृत झाल्यानंतर तुळशी विवाह पासून विवाह वास्तुशांती ग्रह यज्ञ यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे सुरुवात केली जाते. तुलसी विवाह हा दिवस तुळशी देवी आणि भगवान श्रीविष्णू (शाळीग्राम) यांच्या पवित्र विवाहाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून देव जागृत होतात आणि सर्व शुभकार्यांना पुन्हा प्रारंभ करण्यास परवानगी मिळते.

तुळशी विवाह हा केवळ धार्मिक विधी नसून आध्यात्मिक एकात्मतेचा उत्सव आहे. तुळशी म्हणजे पवित्रता, श्रद्धा व भक्तीचे प्रतीक, तर विष्णू म्हणजे धर्म, स्थैर्य व संरक्षणाचे प्रतीक. त्यांच्या मिलनातून आत्मा आणि परमात्म्याच्या दैवी मिलनाचा संदेश दिला जातो.

हा विवाह भक्ताला संयम, निष्ठा व समर्पणाचा आदर्श शिकवतो. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले गेले असून, तिच्या पूजनाने घरात समृद्धी, शांतता आणि शुभत्व नांदते.

एकूणच, तुळशी विवाह हा भक्ती, श्रद्धा आणि शुद्धतेचा सण आहे. या दिवशी तुळशी पूजन व विवाह विधी केल्याने केवळ धार्मिक पुण्यच नव्हे तर मनोशांती व आध्यात्मिक जागृतीही प्राप्त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page