जावलीत आज अठरा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

एकूण – १७८६, डिस्चार्ज १३६९, बळी ४४ ,अँक्टिव्ह ३७३

 सूर्यकांत जोशी कुडाळ –  जावली तालुक्यात आज १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या मध्ये गवडी ११, कुडाळ ३,  हुमगाव २,  सोनगाव १, भणंग १ यांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डा.भगवान मोहिते यांनी दिली आहे.

तहसीलदार शरद पाटील यांच्या अचानक बदलीने खळबळ;

            जावली तालुक्यात तहसीलदार शरद पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविला .समाजाभिमुख काम आणि लोकांच्या तक्रारींचे निवारण करुन तात्काळ कार्यवाही करण्याच्या पद्धतीमुळे जावलीतील जनतेत एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थान मिळवले होते. तसेच सर्वसामान्य जनतेची सन्मानाने व आपुलकीने चौकशी करुन त्यांनी  एक वेगळे ऋणानुबंध निर्माण केले आहेत.गेल्या सहामहिन्यात कोरोना मुळे निर्माण परिस्थिती हाताळण्यासाठी  त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.अशा कर्तव्यदक्ष तहसीलदार पाटील साहेबांच्या बदलीचे वृत्त समजताच तालुक्यात खळबळ माजली.

          पाटील साहेब जावली तालुक्यात हजर होऊन जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले आहे असे असताना त्यांची बदली होणे जावलीतील जनतेला अनपेक्षित होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेने सोशल मिडियाच्या माध्यमातून तहसीलदार पाटील साहेबांची बदली रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

        गेल्या सहामहिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसीलदार पाटील साहेब , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, सपोनि निळकंठ राठोड व त्यांची टीम परिस्थिती अत्यंत धीरोदात्त पणे हाताळत होते. प्रशासनाने जनतेशी साधलेली जवळीक आणि आपुलकीच्या जोडलेल्या नात्या मुळेच या कालावधित  प्रशासनाकडून मदतीचे आवाहन होताच आठदिवसांत वस्तू व रोख स्वरुपात लोकांनी मदत केली.

बुद्धे साहेब तुम्ही जावलीतून जाण्याची घाई करु नका.

        तहसीलदार शरद पाटील यांच्या बरोबर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी जावलीचा प्रशासकीय कारभार अत्यंत पारदर्शी व शिस्तबद्ध केला आहे. तालुक्यातील बारीकसारीक घडामोडीं बुद्धे साहेबाना आता परिचित आहेत. त्यामुळे आता बुद्धे साहेबांनी जावलीतून अन्यत्र जाण्याची घाई करु नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular