Sunday, April 5, 2026
HomeTop Newsकुडाळच्या पिंपळबनात ओपन जीम व खेळ साधने दाखल

कुडाळच्या पिंपळबनात ओपन जीम व खेळ साधने दाखल

सूर्यकांत जोशी कुडाळ – लोकांचे ,लोकांनी, लोकांसाठी लोकसहभागातून निर्माण झालेल्या कुडाळ येथील बहुचर्चित पिंपळबन व बालोद्यान मध्ये अखेर लहान मुलांची खेळ साधने तसेच ओपन जीम उपकरणे दाखल झाली आहेत.

          ग्रामीण भागात बालोद्यान आणि ओपनजीमची संकल्पना प्रथमच पिंपळबनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच ही संकल्पना लोकप्रिय झाली.कुडाळसह अनेक निसर्ग प्रेमींनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद व मदत केली.प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.त्यामुळेच जेमतेम दोन वर्षांत पिंपळबन आणि बालोद्यानने मूर्त रुप धारण केले.

       कुडाळ चे ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांच्या रुपाने पिंपळबनच्या माध्यमातून लावलेले पिंपळ, वड यासह अन्य वृक्षसंपदा आज गावच्या सभोवताली डौलाने डोलत आहे.तसेच उद्यानातील शोभिवंत रोपट्यांनी चांगलेच बाळसे धरले आहे.

    इथल्या मातीत रुजलेले , वाढत असलेले आणि विस्तारत असलेले आपलं पिंपळबन आता लक्ष वेधून घेत आहे.इथल्याच मातीत जन्मलेल्या, मातीवर मनापासून प्रेम करणाऱ्या, आणि या मातीशी नाळ जोडलेल्या असंख्य देणगीदारांच्या मुळेच हे शक्य होत आहे .

       जावली तालुक्यातील *पहिली ओपन जिम* ची संकल्पना त्याचबरोबर लहान मुलांसाठी घसरगुंडी,झोपाळा यासह दर्जेदार फायबर व फेब्रीकेशनची खेळ उपकरणे  पिंपळबनमध्ये दाखल झाली आहेत.लवकरच ही उपकरणे बसविण्याचे काम सुरू होणार आहे . सोबतच आवश्यक ठिकाणी बांधकाम विषयक कामे सुरू आहेत .  याकामी पिंपळबन समितीने वेळोवेळी सर्वाना मदत करण्याचे आवाहन केले  त्याला सातत्याने भाविक , देणगीदार , निसर्गप्रेमी , प्रतिष्ठित लोक , विविध व्यावसायिक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . पुढील कामासाठी अजुनही आर्थिक मदतीची आवश्यकता असून देणगीदार व हितचिंतक यांना आर्थिक तसेच वस्तू रुपाने मदत करण्याचे आवाहन पिंपळबन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

???????? *आपलं पिंपळबन* ????????

माहिती साठी

IDBI BANK

Karanje , Satara

Ac – 0558104000017383

Ifsc – IBKL0000558

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page