पाच दिवसांत तब्बल १४८ जण कोरोना पाँझिटीव्ह .
एकूण – ९३१ , बळी २१, डिस्चार्ज ६२७ ,अँक्टिव्ह २७३
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना मुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला . तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा २२ वर पोहचला आहे. आज २८ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
दरम्यान आज कोरोना बळी गेलेल्या रुग्ना बाबत समजलेली माहिती अशी,झारखंड येथून मजुरीच्या कामावर आलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीला अचानक त्रास जाणवू लागला. अगदी मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात आला होता. त्याची अँन्टीजेन टेस्ट केली असता ती व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या वर मेढा नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेढ्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट
दरम्यान सध्या कोरोनाचा हाँटस्पाँट ठरलेल्या मेढा शहरात आज तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून मेढ्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा १५५ वर पोहचला आहे. याबरोबरच तालुक्यातील सायगांव मध्ये पुन्हा कोरोनाचा पून्हा शिरकाव झाला आहे. आज सायगांव १, भोगवली तर्फ कुडाळ ६, जवळवाडी ३,आंबेघर तर्फ मेढा २, शेते १९ वर्षीय युवती १, गणेश पेठ ६४ वर्षीय व्यक्ती १,व केडंबे येथील मयत व्यक्ती १ अशा एकूण २८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.
तालुक्यात गेल्या पाच दिवसात तब्बल १४८ जण कोरोना बाधित झाले असून आज एक बळी गेला आहे. ही बाब खूप गंभीर आहे. लोकांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक दक्ष रहावे. लोकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घ्यावी.
जावली तालुक्यातील ९ गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील शेते ,दापवडी, म्हाते खुर्द, म्हसवे, रिटकवली,नेवेकरवाडी,उंबरेवाडी,रुईघर (गणेशपेठ),मेढा प्रभाग ५ या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ९ गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
सर्वांनी स्वतः ची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, मास्क व सोशल डिस्टेन्सींग ठेवावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.
लाॅक डाऊन पाळणे अतिशय महत्त्वाच आहे. सर्वांनी घाबरुन न जाता आपला सहभाग दाखवून सहकार्य करावे