सूर्यकांत गजानन जोशी
पत्रकार- दै. ऐक्य, दै.सामना
मी सूर्यकांत गजानन जोशी,
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जावली तालुक्यातील कुडाळ हे जन्म गाव .प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावी कुडाळ येथेच झाले.पुढील शिक्षण सातारा येथे झाले. लहानपणा पासुन फोटोग्राफीचा छंद होता.हा छंदच व्यवसाय म्हणून सांभाळला.सामाजिक कार्याची व लेखनाची आवड असल्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केले. पत्रकारितेच्या यशात सातारा जिल्ह्याचे मुख पत्र दैनिक ऐक्यला मोठे श्रेय जाते. त्यानंतर लोकमत व सामना या दैनिकांच्या माध्यमातूनही समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडुन जनतेला न्याय मिळवून दिला.जावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून सन 2000 ते 2002 काम पाहिले. याकाळात पत्रकार संघ रजिस्टर करून कायदेशीर मान्यता मिळवली, या कालावधीत वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन, मतिमंद मुलांच्या शाळेला मदत यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवले,
महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला.या संघटनेच्या जावली तालुक्यात दारूबंदी करण्यासाठी च्या मोहिमेत प्रसिद्धी माध्यमातून पूर्ण सहभाग दिला. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच कुडाळ येथील प्रसिद्ध गजराज मित्र मंडळाच्या वतीने गजराज जावली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जावली तालुक्यातील एकमेव क्रषिऔद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभारणी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या कारखान्याच्या उभारणी साठी आवश्यक ते प्रसिद्धी देऊन लोकांचे प्रबोधन केले.त्यानंतरच्या निर्माण परिस्थितीत शेतकरी व कामगारांचे प्रश्नावर दैनिकांमधुन आवाज उठवुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.तालुक्यातील कुडाळ विभागाला वरदान ठरणाऱ्या कुडाळी प्रकल्पांतर्गत होणार्या महुहातगेघर धरण होण्यासाठी ही दैनिकांमधुन विविध लेख प्रसिद्ध केले. याबरोबरच धरणग्रस्तांच्या व्यथांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवला.
कुडाळगावच्या सर्वांगीण विकास कामात नेहमीच सक्रिय सहभाग असतो.गावात सध्या साकार होत असलेल्या पिंपळबन उद्यान निर्मिती मध्येही संयोजकांना साथ देत आहे. देशावर व राज्यात आलेल्या कोरोना संकटात तालुका प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. व यालढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अजूनही दैनिक ऐक्य मध्ये लिखाण सुरु आहे.