HomeTop Newsअभूतपूर्व उत्साहात घरोघरी गौरी पूजन

अभूतपूर्व उत्साहात घरोघरी गौरी पूजन

अभूतपूर्व उत्साहात आज गौरी पूजन

 पिंपळबन मधील व्रक्षवल्लींच्या माध्यमातून साकारलेली सजावट लक्षवेधी

सूर्यकांत जोशी कुडाळ – सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती सोबतच गौरींचे आगमन झाले असून आज महिला वर्गाने अभूतपूर्व उत्साहात गौरी पूजन केले. या निमित्ताने घरोघर विविध प्रकारची सजावट करण्यात येते. कुडाळला भूषणावह ठरणाऱ्र्या पिंपळबन मधील व्रक्षवल्लींच्या माध्यमातून या प्रकल्पाचे संकल्पक महेश पवार यांनी केलेली सजावट लक्षवेधी ठरत होती.

            आज घरोघर गणपती व गौरींपुढे आकर्षक सजावट करण्यात आली होती.देवाना पुरण पोळीसह विविध मिष्टांनाचा नैवेद्य करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गानेही विशेष काळजी घेऊन मर्यादित घरी हळदी कुंकु समारंभ केला.जरी हळदीकुंकू च्या निमित्ताने सजावट पाहण्यासाठी घरी फारसे कोणी येणार नसले तरीही नेहमी प्रमाणे किंबहुना काही अधिक प्रमाणात सजावट करुन वाँटसप, फेसबुक इत्यादी सोशल मिडियाच्या माध्यमातून फोटो व व्हिडीओ शुटिंग आपल्या सग्यां पर्यंत पोहचवले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular