मोठ्या ग्रामपंचायती नागरी सुविधा पुरीवणे २०२३-२४ च्या अंतर्गत सातारा-जावली विधानसभा मतदार संघ चे आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन
कुडाळ येथे शिक्षक कॅालनी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी रुपये ५,००,०००/-लक्ष व कुडाळ येथे हाजीमलंग यांचे घराकडे जाणारा रस्ता व गटर करणे रुपये १०,००,०००/-लक्ष निधी दिला आहे. कुडाळ गावातील अन्य विकास कामासाठी निधी मिळावा यासाठीही सातत्याने आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांच्या कडे पाठपुरावा सुरु आहे.अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.आ. भोसले यांनी पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल कुडाळ ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानले जात आहेत.