Saturday, April 11, 2026
HomeTop Newsआ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून जावलीतील रस्त्यांसाठी सुमारे दहा कोटींची अर्थ संकल्पात तरतूद

आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून जावलीतील रस्त्यांसाठी सुमारे दहा कोटींची अर्थ संकल्पात तरतूद

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील विविध रस्त्यांची सुधारणा, मजबुतीकरण व आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून सुमारे दहा लाख रुपयांच्या निधीची  अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

           यामध्ये जावली तालुक्यातील आंबेघर केडंबे बोंडारवाडी रस्ता मजबुतीकरण ४ कोटी २७ ,कास ते महाबळेश्वर शिवकालीन राजमार्गावरील चार लहान पूल बांधण्यासाठी २ कोटी ६६ लाख,दिवदेव मार्ली आखाडे या रस्त्यावरील मार्ली ते भालेकर या मार्गांची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ४२ व पाचवड ते मेढा रस्ता रुंदीकरणासाठी १ कोटी.४२ लाख रुपयांची तरतूद नुकत्याच झालेल्या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.निविदा प्रक्रिया व कायदेशीर कागदोपत्री तरतुदी करुन ही मंजूर कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

         पाचवड ते मेढा या रस्त्याच्या साईडपट्या दोन्ही बाजूने खचल्याने या रस्त्यावर दररोज अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत.तर आता पर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.तसेच वाहन चालकांमध्ये अनेकदा वादावादी होत आहे.या रस्त्याच्या कामासाठी आ.शिवेंद्रसिंहराजेंनी  निधीची तरतूद करुन घेतल्या बद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page