सूर्यकांत जोशी कुडाळ -कुडाळी प्रकल्पाच्या महू व हातगेघर धरणातील पाणी माण तालुक्यातील आंधळी धरण भरण्यासाठी नेहण्यात येणार होते. परंतु ही बाब आपल्या लक्षात येताच प्रशासनाचा हा प्रयत्न आपण वेळीच रोखला. जावली तालुक्याच्या हितासाठी आपण सदैव दक्ष असल्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सोमर्डी येथे एका कार्यक्रमात सांगितले. सोमर्डी गावातील रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे ग्रामस्थांना माहित नव्हते त्यामुळे रवींद्र परामणे यांनी या रस्त्याची मागणी केली होती.परंतु हे काम मंजूर झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल व हे काम अत्यंत दर्जेदार होण्यासाठी सुद्धा आपण सूचना दिल्या असल्याचे सांगून आमदार शिवेंद्रराजे यांनी सोमवारी ग्रामस्थांना सुखद धक्का दिला.