Thursday, February 19, 2026
HomeTop Newsइनरव्हील क्लब झोन ३ सदस्ययांची कुडाळच्या पिंपळबनला भेट

इनरव्हील क्लब झोन ३ सदस्ययांची कुडाळच्या पिंपळबनला भेट

पिंपळबनात वृक्षारोपण करताना इनरव्हील क्लब चे सदस्य व ग्रामस्थ

 

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथे निसर्ग प्रेमी व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून साकारलेल्या पिंपळबन उद्यानाला पुण्याच्या इनरव्हील क्लब झोन ३ च्या सदस्यांनी नुकतीच भेट दिली.ग्रामीण भागात लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी इनरव्हील क्लब तर्फे कुडाळच्या पिंपळबनला  उद्यानात वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करिता भरीव स्वरूपात आर्थिक सहकार्याची मदत करण्यात आली.

          यावेळी इनरव्हील क्लबच्या प्रांतपाल रोहिणीताई वैद्य , महाबळेश्वर अध्यक्षा दीपा गाडेकर.आय एस ओ.पौरवी साळुंखे,माजी अध्यक्षा मंजू कुमार ,सेक्रेटरी स्वाती बिरामने सुनीला रेड्डी तसेच कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे , पिंपळबनचे संकल्पक कार्यकर्ते महेश पवार ,राहुल ननावरे, सचिन मदने ,चेतन दळवी, महेश कदम , प्रतिक मदने , विजय चिकणे व अतुल पवार इत्यादी सदस्य उपस्थित होते.

       कुडाळयेथील आपलं पिंपळबनच्या वतीने चालू वर्षी केल्या जात केल्या गेलेल्या वृक्षारोपण मध्ये इनरव्हील पुणे विभाग व झोन – 3 मधील प्रमुख ८ क्लबच्यावतीने पिंपळ ,वड , आवळा , पेरू,  जांभूळ ,  कांचन , बेल , सोनचाफा,इत्यादी प्रकारच्या विविध देशी झाडांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत देण्यात आली .

           इनरव्हील क्लब ऑफ पुणे यांचे वतीने  पिंपळबनसाठी सात हजार पाचशे रुपये , इनरव्हील क्लब झोन – 3 मधील प्रमुख आठ क्लब- महाबळेश्वर, भोर,  कराड ,कराड संगम,  कोरेगाव, लोणंद , सातारा ,सातारा कॅम्प यांच्यावतीने रुपये दहा हजार ,कै. अजय भाई खक्कर यांचे स्मरणार्थ श्रीमती सोनाली खक्कर यांच्याकडून वटवृक्षारोपण साठी ₹ पाच हजार रुपये अशा एकूण बावीस हजार रुपयांच्या निधीचा धनादेश पिंपळबन समितीकडे सुपूर्द करण्यात आला .

           येणाऱ्या काळात निसर्ग संवर्धन करताना वृक्षारोपण अधिक चांगल्या पद्धतीने व  उद्यानासाठी आवश्यक असणारे विविध गोष्टी उपलब्ध करून देण्याची ग्वाही क्लबच्या वतीने देण्यात आली .

         माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महेश पवार यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page