Monday, April 6, 2026
HomeTop Newsउमेदवारी मिळवण्यासाठी म्हसवे गण भाजपात जोरदार रस्सीखेच:उमेदवारीचा लिलाव की निष्ठेला न्याय मिळणार

उमेदवारी मिळवण्यासाठी म्हसवे गण भाजपात जोरदार रस्सीखेच:उमेदवारीचा लिलाव की निष्ठेला न्याय मिळणार

सूर्यकांत जोशी कुडाळ -आगामी निवडणुकीत कुणबी कार्ड वापरून ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांना म्हसवे गटातून उमेदवारी द्यावी. तसेच या गणाची उमेदवारी दक्षिणे कडील गावात द्यावी अशी मागणी म्हसवे गटातील पंधरा गावांच्या बैठकीत करण्यात आली.भाजपातून म्हसवे गणाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या जोरदार रस्सी खेच सुरु आहे.दरम्यान या निवडणुकीत उमेदवारीचा आर्थिक निकषावर लिलाव होणार की कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि कर्तृत्वाला न्याय मिळणार याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात आहे.

                 रानगेघर, आलेवाडी, पदुमले मुरा, धनगरवाडी, शेडगेवाडी, रेंडिमुरा, धोंडेवाडी, मानकरवाडी,ढेबेवाडी, दरे बुद्रुक, करंदोशी, नेवेकरवाडी या पंचक्रोशीची मीटिंग वसंतराव मानकुमरे भाऊ , सौरभ बाबा शिंदे, संदीप परामने,यशवंत आप्पा भालेघरे यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर मीटिंग मध्ये पंचक्रोशीच्यावतीने मानकुमरे भाऊ यांनी जिल्हा परिषदला म्हसवे गटातून उभे रहावे अशी विनंती करणेत आली, तसेच आजपर्यंत या विभागाला संधी मिळाली नाही म्हणून पंचायत समितीचे तिकीट या विभागामध्ये देण्यात यावे यासाठी आग्रही मागणी करण्यात आली. यासंदर्भात लवकरच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून वरील दोन्ही मागण्या करण्याचे ठरले आहे याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष विकास धोंडे, प्रतापगड कारखाना एम डी राजेंद्र भिलारे, दरे सरपंच संतोष महामुलकर, सोसायटी चेअरमन रवींद्र महामुलकर, संजय पवार, करंदोशी उपसरपंच प्रमोद कांबळे , चेअरमन नामदेव नेवेकर, दिलीप महामुलकर, सचिन महामुलकर, जीवन भोसले, काशिनाथ पार्टे, मारुती ढेबे, संतोष धोंडे, शंकर हिरवे, शांताराम मानकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page