किंग आॅफ टायगर कल्याण ग्रुपच्या प्रयत्नातून कल्याण – मेढा – कल्याण एसटी बस सुरू
कुडाळ – जावली तालुक्यातील मुंबई करांसाठी अत्यंत आवश्यक असणारी कल्याण मेढा कल्याण एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.यासाठी किंग आँफ टायगर कल्याण ग्रुपच्या मध्यमातून विषेश प्रयत्न करण्यात आला.
किंग आँफ टायगर कल्याण ग्रुपच्या मध्यमातून एस टी महामंडळाचे आगारप्रमुख श्री विजय गायकवाड साहेब यांना कल्याण , डोंबिवली, महापे , कोपरखैरणे पाचवड, कुडाळ, हुमगाव, इंदवली , दरे आणि मेढा या मार्गावर एसटी बससेवा चालु करण्यासाठी निवेदन देण्यात आले.जावली तालुक्यातील मुंबई स्थित लोकांची गैरसोय लक्षात घेऊन क्षणाचा विलंब न करता आगार प्रमुखांनी मागणी मान्य केली.त्यानुसार वरील मार्गाने बस सेवा शनिवार दिनांक २६/०६/२०२१ रोजी सकाळी ६.०० वा कल्याण एसटी डेपोमधुन सुरु करण्यात आली आहे.
परतीचा मार्ग मेढा येथुन वरीलप्रमाणे दुपारी २.३० वा. कल्याणला येण्यासाठी राहील.
तरी वरील बसचा जावलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन किंग आॅफ टायगर ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

