Sunday, May 31, 2026
HomeTop Newsकास जवळच्या डोंगरात आढळला फास लावलेल्या अवस्थेत मृतदेह

कास जवळच्या डोंगरात आढळला फास लावलेल्या अवस्थेत मृतदेह

कुडाळ – जावली तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  कास गावानजीक कासवारा हॉटेल जवळील डोंगरावरील जंगलमध्ये दुपारी लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस एक पुरुष जातीचे इसमाने गळफास घेतलेल्या अवस्थेतील हाडांचा सांगाडा दिसून आला होता. त्याने त्याची माहिती दिल्यानंतर दुपारी 4 वाजता आम्ही व स्टाफ ने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मयताची व आजूबाजूची पाहणी केली असता त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे आधारकार्ड मिळून आले त्यावरून त्यांचे नाव आनंदराव श्रीपती जिमन रा. राकुसलेवाडी, पो. आसनगाव, असे असल्याचे समजल्याने आम्ही बोरगाव पो स्टे ला संपर्क केला असता नमूद व्यक्ती 10/10/2025 पासून मिसिंग असल्याची माहिती मिळाली त्यांना सदर व्यक्तीबाबत माहिती देऊन स पो नि बोरगाव पो स्टे यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळविले, त्यावरून मयताचे नातेवाईक घटनास्थळी येऊन त्यांनी मयताचे कपडे, आधारकार्ड ओळखल्याने मयत इसमाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
इंक्वेस्ट पंचनामा करून स्पॉट PM केले आहे. अकस्मात मयत दाखल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page