कुडाळ परिसरात मुरळधार पाऊस
काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान
सूर्यकांत जोशी – गेले चार दिवस जावली तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.आज कुडाळ परिसराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.सकाळ पासून हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोकउखाड्याने हैराण झाले होते.अखेर दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली.
बहुतांश खरीप पिकांची या आठवड्यात काढणी सुरू होणार आहे. त्यामुळे हा काढणीस आलेल्या पिकांना मारक ठरणार आहे. तर उशिरा पेरणी झालेल्या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.