Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळ पोलीस दूरक्षेत्राजवळ ओमणीची ऊसाच्या ट्राँलीला पाठीमागून जोरदार धडकेत मेढा येथील चौघे...

कुडाळ पोलीस दूरक्षेत्राजवळ ओमणीची ऊसाच्या ट्राँलीला पाठीमागून जोरदार धडकेत मेढा येथील चौघे जखमी.

मेढा येथील चौघे जखमी ;

 सूर्यकांत जोशी कुडाळ:- कुडाळ येथील पोलीस दूरक्षेत्रापासून जवळच उभ्या असलेल्या एका उसाच्या ट्राँलीला पहाटे तीनच्या सुमारास ओमणी कार नं.MH 08 R 0940 पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मेढा येथील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

               या अपघातात मेढा येथील भाजीपाला व्यापारी  आनंदा ढेबे ,त्यांची पत्नी व अन्य दोघे जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

        याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मेढा येथील भाजीपाला व्यापारी आनंद ढेबे हे होलसेल भाजीपाला आणण्यासाठी ओमणी कार मधून  पहाटे वाईकडे निघाले होते.दरम्यान कुडाळ पोलीस दूरक्षेत्रापासून जवळ रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेली ट्रक्टर ट्राँली उभी होती. या ट्राँलीला ओमणीची जोरदार धडक बसली.ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेच्या आवाजाने तसेच गाडीतील लोकांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक झोपेतून जागे होऊन घटनास्थळी धावले.तसेच दूर क्षेत्रातील सहा.पोलीस उपनिरीक्षक वाव्हळ तसेच कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले व या ओमणी गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला.

         ओमणी गाडी उसाच्या ट्रालीत एवढी अडकली होती की ती काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.जखमींना पुढील उपचारासाठी १०८ अँम्ब्युलन्सने सातारा येथे पाठवण्यात आले.

             या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून या लाईट त्वरित सुरु करण्यात याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page