कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळची प्राथमिक शाळा ही सर्वाधिक पटसंख्या असणारी केंद्र शाळा आहे. त्यामुळे या शाळेतील उपक्रम आणि शैक्षणिक दर्जा हा तालुक्यातील अन्य शाळांसाठी दीपस्तंभ आहे. या शाळेतील विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचा व गावाचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे बाबा यांनी केले.
कुडाळ जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी यांना सौरभ शिंदेव मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम , सोसायटी चे चेअरमन मा. मालोजीराव शिंदे, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, सदस्य धैर्यशील शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी कर्णे , सर्व सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.