Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळ येथे फोटो स्टुडिओत चोरी

कुडाळ येथे फोटो स्टुडिओत चोरी

कुडाळ  – जावली तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कुडाळ येथील स्वस्तिक फोटो स्टुडिओत शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कँमेरा व फोटोग्राफी साहित्याची चोरी केली. 

             चोरट्यांनी स्टुडिओच्या  दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व स्टुडिओतील निकाँन कंपनीचे दोन कँमेरे,एक फ्लँश, पेनड्राईव्ह,रोख आठ हजार रुपये असा जवळपास ऐंशी हजारांचे साहित्य चोरी केले.

       याबाबत अधिक माहिती घेतली असता शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन च्या दरम्यान ही चोरी करण्यात आली आहे.सदर अज्ञात चोरटे बाजारसमितीच्या मैदानातून पुढे पसार झाले आहेत.याबाबत फोटोस्टुडिओचे मालक सूर्यकांत जोशी यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून हे चोरटे लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अधिक तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबर करत आहेत.

      सदरहु चोरीबाबत चोरट्यांचे नाव मुद्दे मालाची माहिती देणार्याला  सूर्यकांत जोशी यांनी एकवीस हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. तसेच सदर खबर्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page