HomeTop Newsकुडाळ येथे सँनिटायझर टनेलची उभारणी

कुडाळ येथे सँनिटायझर टनेलची उभारणी

कुडाळ येथे तालुक्यातील पहिल्या सँनिटायझर टनेलची उभारणी:कुडाळ युवा मंच ,गजराज मंडळ,साई मित्र मंडळा व  ९२ ग्रुपचा अभिनव उपक्रमः

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ येथे सँनिटायझर टनेल उभारण्यात आला आहे. कुडाळ येथील सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कुडाळ युवा मंच,गजराज मित्र मंडळ, ९२ ग्रुप व साई मित्र मंडळाच्या वतीने बाजारपेठेत येणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

                जावली तालुक्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह पर जिल्हयातुन पंचवीस हजारांहून अधिक लोक आले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.तालुक्यातील निझरे येथे मुंबई हुन आलेल्या दोन व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह निघाल्या तर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाचीही कोरोना टेस्ट पाँझिटीव्ह आली. त्यामुळे तालुक्यात कोरोना पाँझिटीव्ह तीन रुग्ण झाले आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही लोकांचे अहवाल अजुन यायचे आहेत. एकूणच या घटनेनंतर जावलीतील जनता अधिक जागरूक झाली असून कोरोनाचा तालुक्यातील शिरकाव रोखण्यासाठी प्रशासना बरोबरच सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळेही नियमास अधिनराहुन मदतीसाठी पुढे येत आहेत.

कुडाळ गावातील बाजारपेठेत येणारी प्रत्येक व्यक्ती या सँनिटायझर टनेलच्या माध्यमातून निर्जंतुक होऊन बाजारात येईल व बाजारातून घरी जाताना सुद्धा निर्जंतुक होऊन घरी जाईल संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल या उद्देशाने या मंडळांनी कुडाळ बसस्थानकासमोर ही सुविधा उपलब्ध केली आहे. मंडळाच्या या अभिनव उपक्रमांचे तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, मेढा पोलीस ठाण्याचे एपीआय नीळकंठ राठोड, पीएसआय संतोष चामे व मान्यवरांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular