Monday, April 6, 2026
HomeTop Newsकुडाळच्या पिंपळबनातील ओपन जिम व बालोद्यानचा शनिवारी लोकार्पण सोहळा;

कुडाळच्या पिंपळबनातील ओपन जिम व बालोद्यानचा शनिवारी लोकार्पण सोहळा;

 कुडाळ- लोकसहभागातून कुडाळ येथे साकारलेल्या  पिंपळबनातील ओपन जिम व बालोद्यानचे शनिवार दि.४  रोजी दुपारी चार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्याचे आयोजन  करण्यात आहे.अशी माहिती या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक महेश पवार यांनी दिली.

             या कार्यक्रमाला खा. श्रीनिवास पाटील, आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे कुडाळच्या सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम व सर्व सदस्य यांच्या सह विविध मान्यवर ग्रामस्थ  उपस्थित राहणार आहेत.

             युवा, महिला व जेष्ठ यांच्या व्यायामासाठी वेगळा विचार करत  जिम साहित्यांची उभारणी करण्यात आली आहे . 

लहान मुलांसाठी दर्जेदार फायबर खेळ उपकरणे  बसविण्यात आले आहेत .

श्री.पिंपळेश्वर मंदिर मार्गावर भाविक व जेष्ठ यांना बसण्याकरता आरामदायी बेंच  बसवले आहेत .देशी विदेशी फुल व शोभिवंत झाडांचे रोपण व सुयोग्य संगोपन केल्याने डौलाने डौलनार्या या झाडांची रंगबिरंगी पानेफुले मोहवुन टाकत आहेत.

          ग्रामीण भागात लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमाला राज्यभरातील विविध स्तरातून शुभेच्छा, मार्गदर्शन तसेच आर्थिक मदत मिळत आहे. सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थाकडुन सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. दररोज सायंकाळी पिंपळबनातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकांची बालचमूसह गर्दी होत असते.चिमुकल्या मुलांचा आणि आबालवृद्धांची उत्कंठा पाहुन हा लोकार्पण सोहळा तातडीने पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

           आज या प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा साजरा होत असल्याबाबत ज्यांनी या प्रकल्पासाठी आपले छोटे मोठे योगदान दिले त्यांच्या कडुन समाधान व्यक्त होत आहे. शनिवारी संपन्न होणारा हा सोहळा आपल्या सर्वांचा असल्याने सर्वांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित रहावे. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. असे आवाहन आपले पिंपळबनच्या संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page