कुडाळला नटराज युवक मंडळाच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न
कुडाळ ता.20 : कोरोना काळात सामाजिक भावना जोपासत वैद्यकीय सेवा बजावणार्या डाँक्टरांनी व नटराज युवक
मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक
कार्यक्रमांना बगल देऊन यांनी कोरोना योद्याचा सन्मान केला असून मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. असे मत
सातारा – जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
कुडाळ ता. जावळी येथील नटराज युवक मंडळाच्या वतीने कोरोना योध्दा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत
होते.
यावेळी जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे, जावळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड
कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, संचालक जितेंद्र शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम,
सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिंदे, डाँ.प्रमोद जंगम यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य व मान्यवर
उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, करोना काळात कोणतेही कारण न देता सातत्याने कार्यरत असलेले कुडाळ येथील
डॉ. प्रमोद जंगम हे लोकांना औषधे देण्यासोबतच धीर देण्याचे आणि बळ देण्याचे काम त्यांनी केले. करोनाशी
लढताना मानसिक आधारही महत्त्वाचा होता हे जाणून डॉ. जंगम आपल्या वैद्यकीय पेशाचा वसा आजही
निभावत आहेत. दवाखाना सुरू ठेवायचा की नाही या संभ्रमात अनेक डाँक्टर असताना त्यांनी एकही दिवस सुटी
न घेता काम केले आहे. तसेच येथील लोकसहभागातून सूरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरसाठीही डाँ
जंगम यांचे व नटराज युवक मंडळाचे मोलाचे योगदान लाभले होते. त्यामुळे डाँ जंगम यांच्या प्रमाणेच वैद्यकीय
सेवा बजावणाऱे सर्वच कोरोना योध्दे हे जनतेसाठी देवदूतच ठरले आहेत असे गौरोवोद्गारही त्यांनी यावेळी
बोलताना काढले. यावेळी सैारभ शिंदे, डाँ प्रमोद जंगम यांनीही मनोगते व्यक्त केली. यावर्षी कोरोनाच्या
प्रभावामुळे मंडळाच्या वतीने अतिशय साधेपणाने गणेश जयंती साजरी करण्यात आली.
व इतर कार्यक्रमांना फाटा
देत कोरोना योध्दा सन्मान सोहळा आयोजित केला, कोरोना काळात कुडाळ भागात डॉ.प्रमोद जंगम यांनी
सेवाभावी वृत्तीने लोकांना सेवा देण्याचे कार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारलेल्या कोविड सेंटरसाठी मोलाचे
सहकार्य दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मंडळाच्या वतीने त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात
आला. यावेळी कुडाळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच,उपसरपंच, आणि सदस्य यांचाही या प्रसंगी मंडळाच्या वतीने
आमदार भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नटराज मंडळाचे अध्यक्ष महेश बारटक्के यांनी सुत्रसंचालन
करून स्वागत केले तर उपाध्यक्ष सचिन वारागडे यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी गणेश खटावकर, हरी शिवदे,
सुरज किर्वे, संदेश तोडकर, विक्रम खटावकर, रणजीत कदम, यांच्यासह मंडळाचे सर्व सभासद ,ग्रामस्थ उपस्थित
होते.
सोबत छायाचित्र आहे क्रkud20p01
कुडाळ ता.जावळी – डाँ जंगम यांचा मंडळाच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कोविड योद्धा
म्हणून सन्मान करण्यात आला