नवराञोत्सवा बाबत महाराष्ट्राचा गृहविभाग अनभिज्ञ ;
सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्रातील भाविकांच्या धार्मिक श्रध्देचा व अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा नवराञोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे.गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधांमुळे हा उत्सव अत्यंत साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला.यावर्षी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने या उत्सवाबाबत ग्रामदेवस्थाने,भाविक, तसेच दूर्गादेवी मंडळे
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतिक्षेत आहेत.शासनाच्या गृहविभागाने नुकतेच या मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे.यामध्ये केवळ दूर्गादेवी मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत.त्यामुळे महाराष्ट्राचा गृहविभाग या उत्सवा बाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे.की शासनाने हे सर्व लोकांच्या इच्छेवर सोपवले आहे याबाबत संभ्रम आहे.
वास्तविक ग्रामीण भागात आपले कुलदेवत व ग्रामदैवत यांचे नवरात्र करण्याचा प्रघात आहे.अनेक गावात नवराञ उपवास असणारे भाविकांचा मुक्काम नऊ दिवस मंदिरात असतो.तर अनेक भाविक दररोज ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिरात जातात.विजयादशमी दिवशी सिमोल्लंघन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गतवर्षी मंदिरे भाविकांच्या साठी बंद होती.तसेच सिमोल्लंघनासाठी परवानगी नव्हती.पऱतू यावर्षी अद्याप पर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना केली नाही. प्रशासनाने ग्रामीण भागातील सण उत्सवाबाबत माहिती घेऊन तातडीने मार्गदर्शन करावे अशी मागणी देवस्थान समिती व भाविकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.